Diwali Bonus : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची दिवाळी भेट

केंद्र सरकारच्या या निर्णयामध्ये पॅरा मिलिटरी फोर्सच्या जवानांचाही समावेश केला जाईल, जास्तीत जास्त ७,००० रुपयांपर्यंतचा दिवाळी बोनस दिला जाईल.

71
Diwali Bonus : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची दिवाळी भेट
Diwali Bonus : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची दिवाळी भेट

दिवाळीनिमित्त सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारने मंगळवारी दिवाळी बोनस जाहीर केला. या अंतर्गत गट ब आणि गट क श्रेणीतील कर्मचाऱ्यांना ३० दिवसांच्या पगाराच्या बरोबरीने पैसे मिळतील. केंद्र सरकारने २०२२-२३ या वर्षासाठी गट-ब अराजपत्रित अधिकारी आणि गट-क कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर केला. केंद्र सरकारच्या या निर्णयामध्ये पॅरा मिलिटरी फोर्सच्या जवानांचाही समावेश केला जाईल, त्यांना जास्तीत जास्त ७,००० रुपयांपर्यंतचा दिवाळी बोनस दिला जाईल. (Diwali Bonus)

दिवाळीच्या मुहूर्तावर अर्थ मंत्रालयाने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना बिगर-उत्पादकता लिंक्ड बोनस देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या गट ब आणि गट क अंतर्गत येणारे अराजपत्रित कर्मचारी जे कोणत्याही उत्पादकता लिंक्ड बोनस योजनेंतर्गत समाविष्ट नाहीत, त्यांना हा बोनस दिला जाईल.

केंद्रीय निमलष्करी दल आणि सशस्त्र दलातील पात्र कर्मचाऱ्यांनाही नॉन-प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस चा लाभ उपलब्ध होईल, असे वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाने म्हटले आहे. यंदाची दिवाळी १२ नोव्हेंबरला आहे. अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाच्या निवेदनानुसार, या बोनसचा लाभ ३१ मार्च २०२३ पर्यंत सेवेत असलेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळेल. तर २०२२-२३ या वर्षात किमान सहा महिने सतत ड्युटी देण्यात आली असून तदर्थ तत्वावर नियुक्त केलेल्या अस्थायी कर्मचाऱ्यांनाही हा बोनस मिळेल मात्र, सेवेत खंड पडू नये. (Diwali Bonus)

(हेही वाचा :Madhya Pradesh Congress : मध्य प्रदेश काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ‘खेळाचा बाजार’

डीएमध्ये ४ टक्के वाढ अपेक्षित आहे

केंद्रीय मंत्रिमंडळ आणि CCEA यांची बैठक होणार असून त्यात डीए वाढीबाबत निर्णय होऊ शकतो. मोदी सरकारने अपेक्षेप्रमाणे केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ केली, तर त्यांना आत्तापर्यंत मिळणारा डीए ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के होईल आणि त्यांच्या पगारात मोठी वाढ होईल. मात्र, अद्यापपर्यंत डीए वाढीबाबत सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

हेही पहा  –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.