Google Pixel 8A : गुगलचा ‘हा’ फोन आहे स्वस्तात मस्त

गुगल कंपनीने गेली काही वर्षं आपल्या पिक्सेल फोनचं किफायतशीर व्हर्जन बाजारात आणण्याचाची तयारी करत आहे. आता गुगल पिक्सेल ८ए ची तयारी पूर्ण झाल्याचं बोललं जातंय.

74
Google Pixel 8A : गुगलचा ‘हा’ फोन आहे स्वस्तात मस्त
Google Pixel 8A : गुगलचा ‘हा’ फोन आहे स्वस्तात मस्त
  • ऋजुता लुकतुके

गुगल कंपनीने गेली काही वर्षं आपल्या पिक्सेल फोनचं किफायतशीर व्हर्जन बाजारात आणण्याचाची तयारी करत आहे. आता गुगल पिक्सेल ८ए ची तयारी पूर्ण झाल्याचं बोललं जातंय. (Google Pixel 8A)

गुगल पिक्सेलच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. गुगल पिक्सेल ८ए हा कंपनीचा स्वस्तातील फोन लवकरच कंपनीकडून लाँच होण्याची शक्यता आहे. तशी कंपनीने अधिकृत घोषणा अजून केली नसली तरी फोनची तयारी पूर्ण झाल्याचं बोललं जातंय. (Google Pixel 8A)

गुगल पिक्सेल ८ या कंपनीच्या मुख्य फोनचं हे स्वस्त व्हर्जन असणार आहे. पण, यातील बहुतांश फिचर मात्र सारखेच असतील. हा फोनही अँड्रॉईडवर आधारित असेल आणि यात ८ जीबी रॅम मेमरी देण्यात आली आहे. फोनचा डिस्प्ले एमोल्ड पद्धतीचा ६.१ इंच आकाराचा असेल. (Google Pixel 8A)

(हेही वाचा – Marathi Recipe : महाराष्ट्रीय रेसिपी बनवायची आहे ? कशी कराल तयारी…)

तर फोनचा प्राथमिक कॅमेरा १२.५ मेगापिक्सलचा असेल. त्याला एलईडी फ्लॅश लाईटही देण्यात आलाय. तर सेल्फी कॅमेरा हा १० मेगापिक्सलचा असेल. फोनचं स्टोरेज मात्र १२८ जीबी इतकं असेल. त्यात वाढ करता येणार नाही. म्हणजे एसडी कार्डची सोय यात नाही. (Google Pixel 8A)

फोनमध्ये दोन सिम वापरता येतील. गुगल पिक्सेल ८ ची किंमत ८९,००० रुपये इतकी आहे. तर ८ प्रोची किंमत १,०९,००० रुपये इतकी आहे. अशावेळी साधारणपणे तेच फिचर असलेला ८ए फोन हे गुगल पिक्सलचं किफायतशीर रुप आहे. यापूर्वी कंपनीच्या पिक्सेल ७ए फोनला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. गुगल पिक्सेल ८ए ची किंमत साधारण ३०,००० रुपये इतकी असेल असा अंदाज आहे. (Google Pixel 8A)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.