ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली फसवणूक! Google ने दिला सावधतेचा इशारा

108

सध्या डिजिटलायझेशनचे युग असल्याने सर्वाधिक व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने होताना दिसत आहेत. त्यामुळे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार देखील वाढत आहेत. अशातच सध्या लॉटरीशी संबंधित फसवणुकीचे प्रमाण वाढत असून लोकांच्या मोबाईलवर लॉटरी जिंकण्याचे मेसेज येत आहेत. काहीवेळा फसवणूक करणारे नामांकित आणि प्रसिद्ध ब्रँडची नावे वापरून लोकांना लुबाडले जात आहे. भारत सरकारच्या नावाने अशा काही बनावट लॉटरी योजना तयार केल्या जात आहेत. या योजनांवर लोकांना विश्वास बसवण्यासाठी त्यांचा बेकायदेशीपणे वापरही सुरू आहे. याचे वाढते प्रमाण लक्षात घेता सरकाराने नुकतेच ऑनलाइन अॅडव्हायझरीमध्ये अशा योजनांबाबत लोकांना सावध केले आहे.

(हेही वाचा – रिलायन्स Jio चा स्वस्तातील 5G फोन लवकरच लॉन्च होणार, काय आहेत फीचर्स?)

देशात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असताना सायबर गुन्हांच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. हे पाहता गुगलने सेफर विथ गुगल इनिशिएटिव्ह इव्हेंटच्या माध्यमातून भारतातील ऑनलाईन सुरक्षिततेशी संबंधित मुद्द्यांवर विशेष भर दिला असून इंटरनेटचा वापर करणाऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. यासंदर्भात गुगलने ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये गुगलने अशा फसवणूकीपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

कशी केली जाते फसवणूक

सर्वप्रथम युजरला एसएमएस, व्हॉट्सअप किंवा फेसबुकद्वारे लिंक पाठवली जाते. युजरला विश्वासात घेण्यासाठी तुम्हाला ५० लाखांची लॉटरी लागली आहे आणि जिंकलेली रक्कम मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करा. त्या लिंकवर क्लिक केल्यावर वेबासाईट उघडते. त्या लिंकवर गेल्यावर नाव, पत्ता, बँक खात्याचे तपशील इत्यादींची माहिती मागवली जाते. युजरने चुकूनही सर्व माहिती दिली तर तो या ऑनलाईन फसवणुकीला बळी पडू शकतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.