मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; Metro Aqua Line मार्गावरील ‘हा’ मार्ग प्रवाशांसाठी खुला

167

Metro Aqua Line : मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. दरम्यान आरे ते वरळी नाकापर्यंत मेट्रो धावणार आहे. त्यानंतर शनिवारी १० मे पासून हा टप्पा प्रवाशांसाठी खुला होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मेट्रो व्यवस्थापनांचे अधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. (Metro Aqua Line)

मेट्रो लाईन ३ ही मुंबईतील पहिली पूर्णपणे भूमिगत मेट्रो लाईन आहे. मेट्रो लाईन ३ च्या एकूण ३३.५ किमी लांबीच्या टप्पापैकी आरे जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड ते बीकेसी पर्यंतचा १२.६९ किमी लांबीचा टप्पा ७ ऑक्टोबर २०२४ पासून प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी आरे ते वरळीदरम्यान मेट्रोची (Aarey to Worli Metro) चाचणी केली जाणार आहे. हा टप्पा एकूण २२ किलोमीटरचा आहे. हा टप्पा धारावी, दादर, सिद्धिविनायक, वरळी आणि बीकेसीसारख्या अनेक वर्दळीच्या भागांना जोडेल. तसेच मेट्रो लाईन ३ चे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना आरे डेपोपासून दक्षिण मुंबईतील कफ परेडपर्यंत जलद प्रवास करता येईल. यात मुंबई सेंट्रेल, छत्रपती शिवाजी महाराज आणि चर्चगेटसह एकूण २७ स्थानकांचा समावेश आहे.

(हेही वाचा – India Pakistan War : लवकरात लवकर लाहोर सोडा; अमेरिकेच्या नागरिकांना सूचना)

यापूर्वी, आरे ते बीकेसी पर्यंत पसरलेल्या मेट्रो लाईन ३ (Metro Aqua Line 3) चा पहिला टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झाला होता. तसेच या भूमिगत मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून मुंबईतील जनतेला ही एक अनोखी भेट दिली. या विभागाला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

रस्त्यावरील वाहतुकीचा भारही कमी होईल
नवीन विभागात एकूण सहा स्थानके असतील, धारावी, शितलादेवी, दादर, सिद्धिविनायक, वरळी आणि आचार्य अत्रे चौक. या स्थानकांद्वारे प्रवाशांना शहरातील महत्त्वाच्या व्यावसायिक केंद्रांवर तसेच प्रमुख धार्मिक स्थळांवर जलद आणि सहज प्रवेश मिळेल. या विस्तारानंतर, अ‍ॅक्वा लाईनची एकूण लांबी २२.५ किमीपर्यंत वाढेल. ही मेट्रो सेवा वरळी, बीकेसी, अंधेरी, सीप्झ आणि एमआयडीसी सारख्या महत्त्वाच्या भागांना जोडेल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी होईल.

हेही पहा –


Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.