Ganeshotsav : गणेशभक्तांसाठी गुड न्यूज; पनवेल ते इंदापूर सिंगल लेन १० सप्टेंबरपासून खुली होणार

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने मुंबईकर चाकरमानी कोकणात जाण्यासाठी उत्सुक

104
Ganeshotsav : गणेशभक्तांसाठी गुड न्यूज; पनवेल ते इंदापूर सिंगल लेन १० सप्टेंबरपासून खुली होणार
Ganeshotsav : गणेशभक्तांसाठी गुड न्यूज; पनवेल ते इंदापूर सिंगल लेन १० सप्टेंबरपासून खुली होणार

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने मुंबईकर चाकरमानी कोकणात जाण्यासाठी उत्सुक झाले आहेत. त्यांच्या मार्गातील खड्ड्यांचे विघ्न चतुर्थीपूर्वी दूर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूरपर्यंतची सिंगल लेन येत्या १० सप्टेंबरपासून खुली केली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते वाकण फाटा नागोठाणेपर्यंतच्या कामाची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, पनवेल ते कासू आणि कासू ते इंदापूर या दोन टप्प्यातील ८४ किलोमीटरचा रस्ता पूर्ण क्षमतेने तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व मशिनरीचा वापर होत आहे. त्यामुळे सिंगल लेनवरील काम पूर्ण होत आहे. १० सप्टेंबरपासून ही लेन वाहतूकीस पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कासूपासून पुढील कामाची गती वाढविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) चे अधिकारी आणि ठेकेदारांना आदेश दिले आहेत. या टप्प्यातील ७ किमीचा रस्ता थोडा किचकट आहे. स्थिती पाहून नवीन तंत्राचा वापर केला जात आहे. खोलवर सिमेंट काँक्रिटचा वापर, अवजड वाहतुकीमुळे रस्ता खराब होऊ नये यासाठी २० टनी रोलरचा वापर केला जाणार आहे. यासोबतच आधुनिक मशीन उपलब्ध करण्यात आले आहे. कासूपासून पुढील ७ किमी व नंतर ३.५ किमी अंतरावर आर्म टॉपिंग पद्धतीचा वापर होईल. या फेजमध्ये पळस, वाकण फाटा, जिंदल गेट, कोलाड, इंदापूर या भागात विविध अंतरानुसार कामाची विभागणी केली आहे. तर इंदापूर जवळचा टप्पा पूर्ण करताना १६ किमी अंतर व्हाईट टॉपिंग तंत्राचा वापर केला जाईल. असे त्यांनी यावेळी सांगितले.

(हेही वाचा –Talathi Exam :पेपर फोडणाऱ्या आरोपीलाच मिळाले १३८ गुण)

डिसेंबरपर्यंत पूर्ण क्षमतेने वाहतूक

महामार्गाची कामे तातडीने पूर्ण होण्यासाठी वाहतुकीचा अडथळा येऊ नये, यासाठी पोलीस विभागाचे सहाय्य घेण्याबाबत सूचना दिल्या. कोकणातील जनतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या या महामार्गाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुली करण्यात येईल आणि ९ मीटर रुंदीच्या दोन्ही लेन डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गाचे बहुतांश काम जवळजवळ पूर्ण झाले, अशी मंत्री चव्हाण यांनी दिली.

अन् मंत्र्यांनी केली वाहतूक कोंडी दूर

– मुंबई गोवा पाहणी दौरा सुरू असताना पेणच्या हॉटेल साई सहाराजवळ एक एसटी बंद पडल्यामुळे सुमारे दोन ते अडीच तास वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे जिते गावच्या पूलापासून हॉटेल साई सहारा व तेथून पेणकडे जाणाऱ्या महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

– अखेर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण स्वतः रस्त्यावर उतरले आणि चालत हॉटल साई सहारापर्यंत गेले. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत बंद एसटीला क्रेनच्या साह्याने बाजूला केले. सुमारे दोन तासानंतर एसटी बाजूला करण्यात यश आले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.