Gokhale Bridge चे काम अंतिम टप्प्यात; उर्वरित कामे जलदगतीने करण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश

322
Gokhale Bridge चे काम अंतिम टप्प्यात; उर्वरित कामे जलदगतीने करण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश

अंधेरी पूर्व-पश्चिम भागाला जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाचे (Gokhale Bridge) काम प्रगतिपथावर आहे. सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाशी गोखले पुलाची उंची जोडण्याचे काम अतिशय वेगात सुरू आहे. उर्वरित कामे जलदगतीने करुन हा पूल लवकरात लवकर मुंबईकरांच्या सेवेसाठी खुला करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी यंत्रणेला दिले. दोन्ही पूल जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, मुंबईकरांसाठी हा टप्पा लवकरच खुला करण्यात येणार आहे. (Gokhale Bridge)

महानगरपालिकेकडून वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय) तसेच तांत्रिक सल्लागाराच्या देखरेखीखाली गोखले पुलाचे (Gokhale Bridge) काम सुरू आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी बुधवारी ५ जून २०२४ अंधेरी येथे भेट दिली. सह आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उप आयुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार, उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी, उप आयुक्त (परिमंडळ ३) विश्वास मोटे, डी विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे, एच पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते, के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान, के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू, सहायक आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) मृदुला अंडे, जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी आदींसह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) चे अधिकारी उपस्थित होते. (Gokhale Bridge)

(हेही वाचा – T20 World Cup 2024 : हार्दिकची नेट्समध्ये रोहित शर्माला गोलंदाजी)

उद्यानाच्या प्रवेशद्वारावर महिला सुरक्षा रक्षक

दरम्यान, या पाहणी दौऱ्याच्या प्रारंभी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मलबार हिल येथील कमला नेहरू उद्यान (हँगिंग गार्डन), सांताक्रुझ (पश्चिम) येथील लायन जुहू महानगरपालिका बाल उद्यान (एरोप्लेन गार्डन) येथे सकाळी भेट दिली. सांताक्रुझ येथील बाल उद्यानात गगराणी यांच्या हस्ते पुरातन गोरख चिंचेच्या झाडांचे रोपण करण्यात आले. मलबार हिल येथील कमला नेहरू उद्यानाला भेटीप्रसंगी त्यांनी उद्यानात व्यायामासाठी आलेल्या मुंबईकरांशी संवाद साधला. उद्यानात सुरू असलेल्या कामांची आयुक्तांनी माहिती घेतली. तसेच उद्यानात दररोज स्वच्छता करा, वाढलेल्या गवताची कापणी करा, उद्यानात साचणाऱ्या कचऱ्याची दैनंदिन विल्हेवाट लावा, उद्यानाच्या प्रवेशद्वारावर महिला सुरक्षा रक्षक नेमावेत, आदी सूचना त्यांनी यंत्रणेला केल्या. (Gokhale Bridge)

‘एरोप्लेन गार्डन’मध्ये पुरातन गोरख चिचेंच्या झाडांचे रोपण

सांताक्रुझ (पश्चिम) येथील लायन जुहू महानगरपालिका बाल उद्यान (एरोप्लेन गार्डन) येथे आयुक्त गगराणी यांच्या हस्ते पुरातन गोरख चिंचेच्या झाडांचे रोपण करण्यात आले. उद्यानात उपस्थित नागरिकांनी आयुक्त गगराणी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. उद्यानात कार्यरत स्वच्छता कर्मचाऱयांशी संवाद साधत गगराणी यांनी या कर्मचाऱ्यांची पाठ थोपटली. (Gokhale Bridge)

कूपर रुग्णालयात रुग्णांची केली विचारपूस

जुहू येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डॉ. रुस्तम नरसी महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय (कूपर हॉस्पिटल) आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयालाही आयुक्त भूषण गगराणी भेट दिली. आलेल्या रुग्णांची विचारपूस करीत येथील कामकाजाचाही त्यांनी आढावा घेतला. अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील विविध सुविधांविषयी माहिती दिली. (Gokhale Bridge)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.