Narayan Rane: मराठा समाजाला न्याय द्या, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मागणी

यंत्रणांना एकत्र आणून रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार

83
Lok Sabha Elections : त्या पराभवामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणुकीला सामोरे जायला नाही तयार!

राजकीय प्रवास आणि लोकाधिकार चळवळीच्या लढ्याच्या घटनाक्रमावर आधारित ‘शिवसेना, लोकाधिकार आणि मी’ या खासदार गजानन कीर्तिकर यांच्या 57 वर्षांतील कारकिर्दिचा मागोवा घेणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना जवळून पाहिलेली शिवसेना आणि तिचा प्रवास माझ्या दृष्टीकोनातून सांगण्याचा प्रयत्न खासदार कीर्तिकरांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना ‘राज्यात 34 टक्के मराठा समाज आहे. त्यांचा अंत पाहू नका. सत्तेचा उपयोग करून मराठा समाजाला न्याय द्या’ अशी मागणी नारायण राणे यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांकडे केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, स्थानिय लोकाधिकार समितीचा इतिहास कीर्तिकर यांनी पुस्तकात मांडला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी आम्हा सर्वांना मिळाली. मराठी माणसांना नोकरी मिळावी यासाठी त्याकाळी स्थानिय लोकाधिकार समितीने काम केले. भूमिपुत्रांच्या हक्कासाठी स्थानीय लोकाधिकार समितीने काम केले. संघर्ष करून न्याय मिळवून देण्याचे काम केले. नीती आयोगाने मुंबई विकासासाठी सहकार्य करण्याचे ठरवले आहे. यंत्रणांना एकत्र आणून रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार आहोत.

यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री संदीपान भुमरे, खासदार प्रतापराव जाधव, राहुल शेवाळे, डॉ. श्रीकांत शिंदे, आदी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.