Gita GPT; भगवद् गीता संबंधित कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देईल हा चॅटबॉट

925

भारतीय परंपरेचा महत्वाचा ग्रंथ म्हणजे भगवद् गीता…असं म्हणतात की, आयुष्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भगवद् गीतेमध्ये असतं. अनेक महापुरुषांना देखील भगवद् गीता प्रिय होती, कित्येक क्रांतिकारक गीता हातात घेऊन फासावर गेले. इतकंच काय या ग्रंथाचा प्रचार आणि प्रसार जगभरात झाला. या ग्रंथाचे वेगळेपण असे की, ’तुम्ही हा ग्रंथ स्वीकारला नाही, तर आम्ही तुमचे मुडदे पाडू’ असं कुणी म्हटलं नाही त्याचबरोबर या ग्रंथांचा स्वीकार करावा यासाठी आमिष दाखवले नाहीत. लोकांनी स्वेच्छेने हा ग्रंथ मस्तकी लावलेला आहे.

आता बंगळुरु स्थित गूगल सॉफ्टवेअर इंजिनियरने ’Gita GPT’ नावाचा चॅटबॉट विकसित केला आहे. सुकुरु साई विनित या इंजिनियरने Gita GPT चॅटबॉट तयार केला असून भगवद् गीतेमध्ये लिहिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे याद्वारे मिळू शकणार आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की, तुम्हाला दैनंदिन आयुष्यात सतावणार्‍या समस्यांचेच उत्तर या ऍपद्वारे मिळणार आहे. तुमच्या समस्या आणि भगवद् गीतेतील उपाय अशा प्रकारचे स्वरुप असणार आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वापरकर्ते प्रश्न विचारु शकतात आणि एआय चॅटबॉट भगवद्गीतेच्या शिकवणीनुसार उत्तर देईल.

(हेही वाचा सरकार गड-किल्ल्यांचे संवर्धन करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक प्रश्न सतावत राहतात. बर्‍याचदा मोठे प्रश्न समोर असले तर नेमकं काय करायचं हे आपल्या लक्षात येत नाही.  भगवद् गीता हा एक असा ग्रंथ आहे, ज्याद्वारे अनेक लोकोत्तर महात्म्यांनी आपल्या समस्या सोडवल्या आहेत. आता आपल्याला आपल्या जीवनातील प्रश्नांची उत्तरे या चॅटबॉटद्वारे मिळणार आहेत. 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.