Ghaziabad Renamed : आता गाझियाबादचेही नामकरण होणार

उत्तर प्रदेशातील जिल्ह्यांची नावे बदलण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. आता या यादीत गाझियाबाद जिल्ह्याचेही नाव जोडण्यात आले आहे. या जिल्ह्याचे नाव बदलण्यास महानगरपालिकेच्या मंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. यावेळी सभागृहात 'भारत माता की जय "च्या घोषणा देखील देण्यात आल्या.

178
Ghaziabad Renamed : आता गाझियाबादचेही नामकरण होणार

उत्तर प्रदेशातील जिल्ह्यांची नावे बदलण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. यामध्ये आता गाझियाबाद (Ghaziabad Renamed) जिल्ह्याचेही नाव जोडण्यात आले आहे. जिल्ह्याचे नाव बदलण्यास महानगरपालिकेच्या मंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. यावेळी सभागृहात ‘भारत माता की जय “च्या घोषणा देण्यात आल्या.

(हेही वाचा – CM Eknath Shinde : शिवसेनाप्रमुख जिवंत असते, तर त्यांनी मोदींना शाबासकी दिली असती)

महानगरपालिकेच्या मंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे नाव (Ghaziabad Renamed) बदलण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. परंतु गाझियाबादचे नाव बदलून काय ठेवणार यावर चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गजनगर, हरनंदीनगर आणि दुधेश्वरनगर या नावांचा विचार केला जात आहे. या तीन पैकी एका नावावर उत्तर प्रदेश सरकार शिक्कामोर्तब करणार आहे.

राम पार्क बनवण्यावर शिक्कामोर्तब –

यावेळी सदनात एक ठरावही मंजूर करण्यात आला. ज्यामध्ये जनकपुरी भागात रामाच्या नावाने राम पार्क बनवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्याचबरोबर सद्दीक नगरमध्ये क्रीडा केंद्र उभारण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे. (Ghaziabad Renamed)

(हेही वाचा – PM Narendra Modi : मंदिरावर वक्तव्ये करणं टाळा, आस्था ठेवा आक्रमकता नको; पंतप्रधान मोदींनी केले मंत्र्यांना आवाहन)

यापूर्वी नामकरण झालेल्या ठिकाणांची नावे –

उत्तर प्रदेशात योगी सरकार सत्तेवर आल्यानंतर अलाहाबादचे प्रयागराज आणि फैजाबादचे अयोध्या असे नामकरण करण्यात आले. अलीगढचे नाव बदलून हरिगढ करण्याचीही चर्चा सुरु आहे. (Ghaziabad Renamed)

(हेही वाचा – Trinamool Congress : ईडीचे संचालक बंगालमध्ये; तृणमूलची चिंता वाढली)

तसेच मुघलसराय रेल्वे स्थानकाचे नाव बदलून पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे झाशी रेल्वे स्थानकाचे नाव बदलून वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे. (Ghaziabad Renamed)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.