घाटकोपरमध्ये जलवाहिनी फुटल्याने रस्त्याला नदीचे स्वरुप; नागरिकांचे मोठे नुकसान

118

घाटकोपरच्या असल्फा विभागात 72 इंचाची जलवाहिनी फुटल्याने रस्त्याला नदीचे स्वरुप आले आहे. ही जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा प्रचंड फावारा पाहायला मिळत आहे. याचा प्रवाह इतका होता की, यात अनेक दुचाकी, आजूबाजूच्या घरांचे, दुकानांचे साहित्य वाहून गेले आहे.

ब्रिटिशकालीन 72 इंचाची जलवाहिनी फुटली

घाटकोपर येथील असल्फा पाईपलाईन विभागात ब्रिटिशकालिन 72 इंचाची जलवाहिनी आहे. ही जलवाहिनी अतिशय जीर्ण झालेली आहे, त्यामुळे ही जलवाहिनी वारंवार फुटल्याच्या घटना घडत आहेत. यााधी देखील ही जलवाहिनी फुटून अक्षरश: घरे कोसळली होती. तर आता पुन्हा जलवाहिनी फुटल्याने मोठे नुकसान झाल्याचे समजते आहे.

मध्यरात्री 2 ते 2:30 दरम्यान पाण्याची पाईपलाईन फुटली असल्याची माहिती महापालिकेला कळवण्यात आली. मात्र पालिकेचे अधिकारी गैरहजर असल्याचे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान, या जलवाहिनीतून पाण्याचा वेग आता कमी झाला आहे. ही 72 इंची पाईपलाईन खूप जूनी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही पाईपलाईन फूटली असून लोक पाणी थांबण्याची वाट पाहत आहे.

( हेही वाचा: राज्यातील ६ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.