आता मिळवा मोफत आरोग्य सेवा! कशी ते वाचा…

102

गेली दोन वर्षे कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन नियम लागू करण्यात आले होते. अशा परिस्थितीत ज्या लोकांना सामान्य आजार होते त्यांनी रुग्णालयात जाण्यापेक्षा टेलिमेडिसिन सेवेला प्राधान्य दिले. टेलिमेडिसिन म्हणजे घराबाहेर न पडता ऑनलाईन माध्यमातून घरबसल्या सर्वोत्तम डॉक्टरांकडून आरोग्य सल्ला घेणे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने ई-संजीवनी ओपीडी हे पोर्टल सुरू केले आहे. या माध्यमातून तुम्ही मोफत टेलि-कन्सल्टेशन सेवांचा लाभ घेऊ शकतात.

( हेही वाचा : मेट्रो स्थानकांत सुरू होणार खानपान सेवा… या पदार्थांचा घ्या आस्वाद! )

या पोर्टलमुळे आरोग्यविषयक सल्ला घेण्यासाठी नागरिकांना कुठेही जाण्याची गरज नाही, तुम्ही घरबसल्या ऑनलाइन ओपीडी सेवेचा लाभ घेऊ शकता. आताच्या घडिला जवळपास 40 हजाराहून अधिक लोक आरोग्य सेवांसाठी ई-संजीवनी पोर्टलचा वापर करतात. या पोर्टलवर आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी प्रक्रिया, टोकन निर्मिती, लॉगीन, प्रतीक्षालय, समुपदेशन प्रक्रिया इत्यादींची माहिती असणे आवश्यक आहे.

ई-संजीवनी ओपीडी म्हणजे काय?

कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना ई-संजीवनी ओपीडीची खूप मदत झाली आहे. हे पोर्टल सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंगने विकसित केले आहे. एक लाखांहून अधिक डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ञ राष्ट्रीय टेलिमेडिसिन सेवेच्या अंतर्गत, या पोर्टलवर लाभार्थ्यांशी दूरध्वनीवर सल्लामसलत करण्यासाठी कार्यरत आहेत.

सुविधा उपलब्ध

ई-संजीवनी ओपीडी अंतर्गत तुम्हाला अनेक सुविधा मिळतात. यामध्ये रुग्ण नोंदणी, टोकन जनरेशन, व्यवस्थापन, डॉक्टरांशी ऑडिओ-व्हिडिओ सल्लामसलत, ई-प्रिस्क्रिप्शन, एसएमएस/ईमेलद्वारे सूचना, मोफत सेवा इत्यादींचा समावेश आहे.

तुम्ही फायदा कसा घेऊ शकता

ई-संजीवनी ओपीडीचा लाभ घेण्यासाठी, प्रथम या प्लॅटफॉर्मवर नोंदणी किंवा लॉग इन करावे लागेल. ही प्रक्रिया सोपी आहे. यासाठी अधिकृत वेबसाइट https://esanjeevaniopd.in ला भेट द्या. यानंतर, तुम्हाला रुग्ण नोंदणीवर जाऊन नोंदणी करावी लागेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.