Price Reduced: गॅस सिलिंडरच्या किंमतीत १०० रुपयांनी कपात, पंतप्रधान मोदींची घोषणा

122
Price Reduced: गॅस सिलिंडरच्या किंमतीत १०० रुपयांनी कपात, पंतप्रधान मोदींची घोषणा
Price Reduced: गॅस सिलिंडरच्या किंमतीत १०० रुपयांनी कपात, पंतप्रधान मोदींची घोषणा

जागतिक महिला (Price Reduced) दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना गिफ्ट दिले. एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत १०० रुपयांची कपात करण्याची घोषणा केली आहे. १ मार्चला सरकारी कंपन्यांनी व्यावसायिक गॅसच्या किंमतीत वाढ केली, पण घरगुती गॅसच्या किंमतीत कोणताही बदल केला नव्हता. आज ८ मार्च, जागतिक महिला दिनी सिलेंडरच्या किंमती १०० रुपयांनी स्वस्त करण्यात आल्या. गेल्या काही वर्षांत सिलेंडरचे भाव दुप्पटीहून अधिक झाले. काही महिन्यांपूर्वी तर हा भाव ११०० रुपयांच्या घरात पोहचला होता. त्यानंतर सरकारने त्यात २०० रुपयांची कपात केली होती. सबसिडी असलेला १४.२ किलोग्रम घरगुती गॅस आता शंभर रुपयांनी स्वस्त झाला आहे.

किचन बजेटवरील ताण होईल कमी

या निर्णयामुळे देशातील लाखो कुटुंबांवरील आर्थिक बोजा कमी होईल. नारी शक्ती अंतर्गत कुकींग गॅसची किंमत कमी झाल्याने त्यांना मोलाची मदत ठरणार असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. महिलांचे जीवन सुसह्य करणे आणि त्यांना बळ देण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.

(हेही वाचा – Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिला ‘राष्ट्रीय निर्माता पुरस्कार’ प्रदान करणार, १.५ लाखांहून अधिक नामांकनं आणि १० लाख मते)

सध्याचे भाव 
काही वर्षांपूर्वी ५०० रुपयांच्या पण आत मिळणारे घरगुती गॅस सिलेंडर ११०० रुपयांच्या घरात पोहचले होते. याविषयी ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे दिवाळीच्या जवळपास केंद्र सरकारने २०० रुपयांची सबसिडी दिली होती. त्यानंतर दिल्लीत १४.२ किलोग्रॅम सिलेंडरची किंमत ९०३ रुपये, कोलकत्तामध्ये ९२9 रुपये, मुंबईत ९०२.५० रुपये आणि चेन्नईत हा भाव ९१८.५० रुपये आहे.

तीन महिन्यात ६० रुपयांची दरवाढ
डिसेंबरपासून मार्च महिन्यापर्यंत, जानेवारीचा अपवाद वगळता एलपीजी सिलेंडरचा दर ६० रुपयांनी वाढले आहेत. १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजीच्या भावात वाढ करण्यात आली आहे. लोकसभेचा बिगुल केव्हा पण वाजू शकतो. त्या आधी ग्राहकांच्या खिशावर ताण आला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली होती. सध्या ग्राहकांना हॉटेलिंगसाठी जादा पैसा मोजावा लागत आहे.

मुंबईत १९ किलोग्रॅम व्यावसायिक गॅसची किंमत १७०८ रुपयांहून वाढून १७२३ रुपयांवर

दिल्लीत 19 किलोग्रॅम व्यावसायिक गॅसची किंमत १७५५.५० रुपयांहून वाढून १७६९.५० रुपयांवर

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.