Ganpatipule Beach: गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील दुकाने ‘या’ तारखेपासून बंद, कारण काय ?

गेल्या वर्षी समुद्राला उधाण आले आणि या दुकानांचं नुकसान झालं होतं.

204
Ganpatipule Beach: गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील दुकाने 'या' तारखेपासून बंद, कारण काय ?

पावसाळ्यामध्ये किनारपट्टी भागात अधिक सतर्कता बाळगली जाते. सुरक्षेच्या दृष्टीने वेगवेगळ्या नियमांचे पालन करणं गरजेचं असतं. दरम्यान पावसाळ्यामध्ये समुद्राला उधाण येण्याचे दिवस आणि गेल्या वर्षी गणपतीपुळे या ठिकाणच्या समुद्रकिनारी आलेली लाट, त्यातून उद्भवलेला प्रसंग या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे ग्रामपंचायतने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (Ganpatipule Beach)

या निर्णयानुसार, गणपतीपुळे किनारपट्टी भागात असलेली दुकाने ३१मेपासून बंद राहणार आहेत. गेल्या वर्षी समुद्राला उधाण आले आणि या दुकानांचं नुकसान झालं होतं. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला असल्याचं मानलं जातं. दरम्यान दरवर्षी दुकाने १० जूनपर्यंत सुरू असतात. पण यावर्षी मात्र १० दिवस अगोदरच दुकानं बंद केली जाणार आहेत. (Ganpatipule Beach)

(हेही वाचा – Veer Savarkar: भारताची सागरी सुरक्षा, आव्हाने, चिंता आणि… हे पुस्तक म्हणजे वीर सावरकर यांना आदरांजली – बिग्रेडीयर हेमंत महाजन )

दुकाने बंद का?
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर खाद्यपदार्थांसह इतरही विविध वस्तूंची दुकाने आहेत. येथे आल्यावर पर्यटक समुद्रात बोटींगचा आनंद लुटतात, मात्र पावसामुळे या सेवादेखील ३१ पासून बंद राहणार आहेत. कोकणात मान्सूनचं आगमन १० जूनपर्यंत होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर मासेमारीवर आता बंदी घालण्यात आली आहे. सांगली, सोलापूर, धाराशिव, मध्य महाराष्ट्र आणि खान्देशमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरीदेखील लावली आहे. वादळी वाऱ्यासह पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावलीये. पावसामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली आहे, घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे सतर्कतेचा इशारा म्हणून समुद्र किनारपट्टीवरील सर्व भागांना दुकाने बंद करण्यात सांगण्यात आले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.