Gadchiroli Police : गडचिरोलीत नक्षलवाद्याला बेड्या, पोलिसांनी जाहीर केले होते १६ लाखांचे बक्षीस

गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

87
Gadchiroli Police : गडचिरोलीत नक्षलवाद्याला बेड्या, पोलिसांनी जाहीर केले होते १६ लाखांचे बक्षीस
Gadchiroli Police : गडचिरोलीत नक्षलवाद्याला बेड्या, पोलिसांनी जाहीर केले होते १६ लाखांचे बक्षीस

गडचिरोली पोलिसांनी (Gadchiroli Police) धडाकेबाज कारवाई करून एका नक्षलवाद्याला अटक (naxalite arrested) केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

चैनुराम वत्ते कोरसा (४८) असं या नक्षलवाद्याचं नाव आहे. तो छत्तीसगड राज्यातील टेकामेटा गावचा रहिवासी आहे. चैनुराम सध्या डीव्हीसीएम पदावर कार्यरत आहे. चैनुराम २०००मध्ये पर्लकोटा दलममध्ये सामील झाला होता. त्याच्यावर ७ गुन्हे दाखल आहेत. चैनुराम याच्यावर सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलीस दलावर हल्ले करून त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, सरकारी कामात अडथळा आणणे, जाळपोळ करणे, अशी देशविघातक कृत्ये केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

(हेही वाचा – Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, स्वागतासाठी मुख्यमंत्री आणि इतर नेते विमानतळाकडे रवाना )

चैनुराम कोरसा हा गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील कांकेर सीमेजवळ असलेल्या पोस्टे जारावंडी आणि पोस्टे पेंढरी या दोन्ही ठिकाणी रेकी करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.