Mango : हापूस आंब्याच्या नावाखाली पुणेकरांची फसवणूक 

पणन संचालकांनी परिपत्रक काढून ही बाजार समितीचे दुर्लक्ष ; मार्केटयार्डमध्ये सरासपणे कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेशातील आंब्याची देवगड, रत्नागिरी हापूसच्या बॉक्समध्ये भरून विक्री केली

186

हिंदू नव वर्षाच्या स्वागताला म्हणजेच गुढी पाडव्याच्या निमित्ताने बाजारात आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. सध्या बाजारात १२ ते १४ हजार आंब्याच्या पेट्यांची आवक चालू असून, त्यात रत्नागिरी (Ratangiri) आणि देवगड (Devgad) हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंब्याची विक्री केली जात आहे. काही आडत्यांकडून रत्नागिरी आणि देवगड हापूसच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केली जात असताना मात्र बाजार समितीचे याकडे दुर्लक्ष करत आहे. (Mango)

(हेही वाचा – Supriya Sule : सुप्रिया सुळेंच्या स्टार प्रचारकाचे अजित पवारांना समर्थन)

आंबा हा कोकणातील अर्थव्यवस्थेचा मुख्य भाग आहे. यंदा बाजारपेठेत निम्मे आंबे हे कर्नाटकातील (Karnatak) असून कोकणातील हापूससोबत त्याची भेसळ केली जात आहे. यामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे. सध्या हंगाम बहरत असल्यामुळे गुलटेकडी मार्केटयार्ड (Gultekadi Marketyard) फळबाजारात मोठ्या प्रमाणात कोकणासह परराज्यातील आंब्याची आवक वाढत आहे. (Mango)

(हेही वाचा – Mumbai Indians चा IPL मधील पहिला विजय)

तत्कालीन पणन संचालकांनी परिपत्रक काढत अशा फसवणूक करणाऱ्या आडत्यांवर कारवाई 

या फसवणुकीला आळा घालण्यासाठी बाजार समित्या वेगवेगळ्या उपाय योजना करत आहे. तसेच तत्कालीन पणन संचालकांनी परिपत्रक काढत अशा फसवणूक करणाऱ्या आडत्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश राज्यातील सर्व बाजार समित्यांना देऊन सुमारे चार वर्षे होत आले आहेत. मात्र, मार्केटयार्डमध्ये सरासपणे कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेशातील आंब्याची देवगड, रत्नागिरी हापूसच्या बॉक्समध्ये भरून विक्री केली जात आहे. (Mango)

हेही वाचा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.