Shiv Sena : घाटकोपरमधील आणखी एक माजी नगरसेवक शिवसेनेत

शिवसेना उबाठा शिवसेनेचे केवळ तुकाराम पाटील, अर्चना भालेराव हेच माजी नगरसेवक उरले आहेत. तुकाराम पाटील हे उबाठा शिवसेनेचे विभागप्रमुख असून अर्चना भालेराव आणि त्यांचे पती संजय भालेराव यांचे आमदार राम कदम यांच्याशी पटत नसल्याने ते शिवसेनेत येण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे.

1709
Shiv Sena : घाटकोपरमधील आणखी एक माजी नगरसेवक शिवसेनेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मुख्यनेता असलेली शिवसेनाच खरी शिवसेना (Shiv Sena) असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता या शिवसेनेत उबाठा गटातील पदाधिकारी प्रवेश करायला लागले असून शनिवारी घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक १२५ मधील स्थानिक माजी नगरसेविका रुपाली सुरेश आवळे आणि त्यांचे पती माजी नगरसेवक सुरेश आवळे यांनी प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला. यावेळी दोघांच्या हाती भगवा ध्वज हाती देत त्यांचे मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) स्वागत केले आहे. त्यामुळे आतापर्यंत उबाठा गटातील शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांची संख्या ३४ एवढी झाली आहे. (Shiv Sena)

मुंबई महानरपालिकेच्या घाटकोपर येथील वार्ड क्रमांक १२५ च्या माजी नगरसेविका रुपाली सुरेश आवळे आणि त्यांचे पती माजी नगरसेवक सुरेश आवळे यांनी शनिवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यानाही शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे उपस्थित होते. (Shiv Sena)

(हेही वाचा – Police Transfers: राज्य पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या)

‘ते’ शिवसेनेत येण्याची शक्यता कमीच

घाटकोपर विधानसभेतून यापूर्वी प्रभाग १३३ चे परमेश्वर कदम यांनी शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला होता, त्यानंतर प्रभाग क्रमांक १२८ च्या माजी नगरसेविका अश्विनी हांडे आणि माजी नगरेसवक बाबा हांडे यांनी प्रवेश केला होता त्यांनतर आता प्रभाग क्रमांक १२५ मधील माजी नगरसेविका रुपाली आवळे आणि माजी नगरसेवक सुरेश आवळे यांनीही प्रवेश केल्याने या मतदार संघात शिवसेना उबाठा शिवसेनेचे केवळ तुकाराम पाटील, अर्चना भालेराव हेच माजी नगरसेवक उरले आहेत. तुकाराम पाटील हे उबाठा शिवसेनेचे विभागप्रमुख असून अर्चना भालेराव आणि त्यांचे पती संजय भालेराव यांचे आमदार राम कदम यांच्याशी पटत नसल्याने ते शिवसेनेत येण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे. (Shiv Sena)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.