Colaba : कुलाब्यातील झाडांच्या आरोग्याची प्राथमिक तपासणी, पण संपूर्ण मुंबईत कधी होणार?

शुक्रवारी सकाळी कुलाबा येथील शहीद भगतसिंग मार्गावर ऍड मकरंद नार्वेकर यांच्या पुढाकाराने खासगी रित्या प्रायोगिक वृक्ष सर्वेक्षण करण्यात आले.

29
Colaba : कुलाब्यातील झाडांच्या आरोग्याची प्राथमिक तपासणी, पण संपूर्ण मुंबईत कधी होणार?
Colaba : कुलाब्यातील झाडांच्या आरोग्याची प्राथमिक तपासणी, पण संपूर्ण मुंबईत कधी होणार?

मुंबई पावसाळ्यापूर्वी झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी केली जात असली तरी सरसकटच झाडांच्या फांद्या तोडल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात पावसाळ्यात शेकडो झाडे उन्मळून तसेच त्यांच्या फांद्या तुटण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे झाडे पडण्याच्या वाढत्या दुर्घटना लक्षात घेता प्रत्येक झाडांचे आरोग्य तपासणे आवश्यक असून त्यानुसारच मृत झाडे तोडून तसेच झाडांच्या धोकादायक फांद्या तोडल्यास पावसाळ्यात होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळता येणे शक्य आहे. त्यामुळे त्या दृष्टीकोनातून झाडांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेत याची सुरुवात कुलाब्यापासून करण्यात आली आहे. त्यामुळे कुलाब्यात झाडांचे आरोग्य तपासणीचा पायलट माजी नगरसेवक ऍड मकरंद नार्वेकर यांनी प्रोजेक्ट हाती घेण्यात आले असून याची अंमलबजावणी संपूर्ण मुंबईत करावी अशी सूचना नार्वेकर यांनी महापालिकेला केली आहे.

शुक्रवारी सकाळी कुलाबा येथील शहीद भगतसिंग मार्गावर ऍड मकरंद नार्वेकर यांच्या पुढाकाराने खासगी रित्या प्रायोगिक वृक्ष सर्वेक्षण करण्यात आले. ट्रीकोटेक ही अर्बोरिकल्चर फर्म चालवणाऱ्या आर्बोरिस्ट वैभव राजे यांच्या मदतीने या मार्गावरील झाडांचे हे सर्वेक्षण केले गेले. वाढत्या झाडे पडण्याच्या घटना आणि त्यामुळे होणाऱ्या जनतेच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर कुलाब्यातील भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी आज झाडांचे आरोग्य निश्चित करण्यासाठी आणि अशा झाडे पडण्याच्या घटना टाळण्यासाठी पथदर्शी वृक्ष सर्वेक्षण केले. झाडांच्या वैज्ञानिक मूल्यांकनाचा एक भाग म्हणून रेसिस्टोग्राफ उच्च-स्तरीय उपकरणाचा वापरून झाडांचे तपशीलवार सर्वेक्षण केले गेले.

(हेही वाचा – Sambhaji Chhatrapati : सोलापूर, माढ्यासह 2024 च्या लोकसभा निवडणुकीत स्वराज्य पक्ष 48 जागा लढणार)

रेसिस्टोग्राफ मशीनचा वापर झाडांची स्थिरता तपासण्यासाठी आणि झाडांचे सध्याची स्थिती आणि संभाव्य फांद्या किंवा झाड पडणे ओळखण्यासाठी केला गेला. त्यावरील विश्लेषणाच्या आधारे झाडांची उच्च-जोखीम, मध्यम-जोखीम आणि कमी-जोखीम म्हणून वर्गवारी केले जात आहे. मागील काही दिवसांमध्ये झाडे पडून दुघर्टना होण्याचा आणि त्यामुळे होणाऱ्या जनतेच्या मृत्यूंमुळे महापालिकेच्या पावसाळ्यासाठी केलेल्या तयारीचे बारा वाजल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे “नागरिकांच्या सुरक्षेला सर्वाधिक महत्त्व आहे. सुशोभीकरणावर करोडो रुपये खर्च करणाऱ्या महापालिकेने पावसाळ्याच्या तयारीचा एक भाग म्हणून आपले काम व्यवस्थित केले नाही. त्यामुळे आता महापालिकेने आर्बोरिस्टची नियुक्ती करून संपूर्ण मुंबईत झाडांचे सर्वेक्षण केले पाहिजे. जेणेकरून झाड पडून कोणाचाही मृत्यू होणार नाही,” असे मकरंद नार्वेकर यांनी याप्रसंगी बोलतांना स्पष्ट केले.

आजच्या प्रायोगिक सर्वेक्षणाचा अहवाल तयार करून मुंबईत सर्वत्र तो राबवावा यासाठी बीएमसीला सादर करण्यात येईल, असेही नार्वेकर म्हणाले. आर्बोरिस्ट वैभव राजे यांनी यांनी याबाबत बोलतांना, अशा सक्रिय प्रयत्नातून हे दिसून येते की नार्वेकर यांना पर्यावरणाची आणि लोकांची काळजी आहे. “असे आणखी प्रयत्न घेण्याची गरज आहे. खरे तर महापालिकेने ते केले पाहिजे. झाडे वाचवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्यामुळे मागील काही वर्षांत आपण अनेक झाडे गमावली आहेत, जी आपल्याला वाचवता आली असती,” असे राजे यांनी स्पष्ट केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.