धर्मादाय रुग्णालयांच्या संनियंत्रणासाठी विशेष तपासणी पथक तयार करा; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश

जमीन सवलत घेणाऱ्या रुग्णालयांची यादी तयार करण्याची सूचना

54
१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल महाराष्ट्र दिनी जाहीर होणार; CM Devendra Fadnavis यांची माहिती
  • प्रतिनिधी

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू ओढावल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी बुधवारी राज्यातील धर्मादाय रुग्णालयांच्या नियंत्रणासाठी धर्मादाय आयुक्त, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या समन्वयातून विशेष तपासणी पथक तयार करण्याचे निर्देश दिले. याशिवाय महापालिका क्षेत्रात जागा आणि इतर सवलती घेणाऱ्या तसेच महसूल विभागाकडून जमीन सवलत घेणाऱ्या रुग्णालयाची यादी तयार करावी, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, धर्मादाय विश्वस्त नियमानुसार धर्मादाय रूग्णालयात १० टक्के खाटा निर्धन घटक तर १० टक्के खाटा दुर्बल घटकातील रुग्णांसाठी आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. आपत्कालिन परिस्थितीत रुग्ण स्थिर होईपर्यंत तातडीचे उपचार आणि वैद्यकीय सेवा पुरविणे आवश्यक आहे. यासाठी रुग्णालयांनी कोणतेही अनामत रक्कम घेऊ नये.

(हेही वाचा – Unauthorised Construction वरील कारवाई आता अधिक तीव्र; पावसाळ्यापूर्वीच चालवला जाणार हातोडा)

धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने धर्मादाय योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी. धर्मादाय रुग्णालयावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती तयार करावी. केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य विषयक योजनांच्या संलग्नीकरण तसेच समन्वयासाठी प्रयत्न करावेत. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी धर्मादाय आयुक्तांच्या अंतर्गत विभागनिहाय स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी यावेळी दिल्या. धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणी करणाऱ्या रुग्णालयांनी रूग्णांना दिलेल्या उपचाराची माहिती, रुग्ण, शिल्लक खाटा यांची माहिती ऑनलाईन प्रणालीत भरणे सक्तीचे करावे. याबाबत समन्वय करण्यासाठी क्लस्टर तयार करून समिती प्रमुख नेमून माहिती न भरणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी दिले.

(हेही वाचा – Water Cut : मुंबईतील ‘या’ भागात येत्या शनिवार आणि रविवारी राहणार पाणीकपात; काय आहे कारण?)

रुग्णालयात डॅशबोर्ड आणि फलक

राज्यातील प्रत्येक धर्मादाय रुग्णालयात रुग्णांच्या योजना, आजार, उपचाराबाबतच्या माहितीचे मोठ्या अक्षरातील फलक लावावेत. या फलकामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रिक्त खाटांची स्थिती, रुग्णालयात कार्यरत शासकीय योजना आणि इतर माहिती मिळण्यास मदत होणार आहे. सर्व माहिती जाहिररित्या सर्वांना उपलब्ध होण्यासाठी ऑनलाईन प्रणालीवर टाकावी. शिवाय एका डॅशबोर्डवर माहिती दिल्यास रुग्णांना मदत होणार आहे. याचे नियमित अद्ययावतीकरण होण्यासाठी वेगळी यंत्रणा तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी बैठकीत दिल्या. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सोनिया सेठी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्याच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, विधी आणि न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती आदी उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.