Forex Reserves : भारताच्या परकीय गंगाजळीत पुन्हा एकदा विक्रमी वाढ; तिजोरीत ६९२.७२१ अब्ज डॉलर

Forex Reserves : भारताच्या तिजोरीत ७ अब्ज डॉलरची वाढ झाली. 

60
Forex Reserves : भारताच्या परकीय गंगाजळीत पुन्हा एकदा विक्रमी वाढ; तिजोरीत ६९२.७२१ अब्ज डॉलर
  • ऋजुता लुकतुके

भारताच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे. २३ मे रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा ६.९९२ अब्ज डॉलर्सने वाढून ६९२.७३१अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही माहिती दिली आहे. यापूर्वी, १६ मे रोजी संपलेल्या आठवड्यात, देशाचा परकीय चलन साठा ४.८८८ अब्ज डॉलर्सने घसरून ६८५.७२९ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. (Forex Reserves)

सप्टेंबर २०२४ च्या अखेरीस परकीय चलन साठा ७०४.८८५ अब्ज डॉलर्सच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार २३ मे रोजी संपलेल्या आठवड्यात, परकीय चलन साठ्याचा एक प्रमुख घटक असलेली परकीय चलन मालमत्ता ४.५१६ दशलक्ष डॉलर्सने वाढून ५८६.१६७ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. डॉलरच्या दृष्टीने व्यक्त होणाऱ्या परकीय चलन मालमत्तेत परकीय चलन साठ्यात असलेल्या युरो, पौंड आणि येन सारख्या गैर-अमेरिकन चलनांचा चढ-उतार परिणाम समाविष्ट आहे. (Forex Reserves)

(हेही वाचा – India A vs England Lions : इंग्लंड लायन्स विरुद्ध सर्फराझ खानची दमदार फलंदाजी; ११३ चेंडूंत ९२ धावा)

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात सोन्याचा साठा २.३६६ अब्ज डॉलर्सने वाढून ८३.५८२ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. विशेष रेखांकन हक्क (एसडीआर) ८१ दशलक्ष डॉलर्सने वाढून 18.571 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, या आठवड्यात आयएमएफकडे भारताची राखीव ठेवही सुधारली आहे, जी ३० दशलक्ष डॉलर्सने वाढून ४.४०१ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. (Forex Reserves)

स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २३ मे पर्यंत पाकिस्तानचा परकीय चलन साठा ७० दशलक्ष डॉलर्सने वाढून ११.१५६ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. तर १६ मे रोजी तो ११,४४७ अब्ज डॉलर्स होता. पाकिस्तानचा तरल परकीय चलन साठा १६.६३७ अब्ज डॉलर्सवर होता. जो गेल्या आठवड्याच्या तुलनेत १२ दशलक्ष डॉलर्सची किंचित घट दर्शवितो. यामध्ये व्यावसायिक बँकांच्या निव्वळ होल्डिंग्जचाही समावेश आहे. या कालावधीत, व्यावसायिक बँकांच्या निव्वळ राखीव निधीतही ८२ दशलक्ष डॉलरची घट झाली, जी ५.२१२ अब्ज डॉलर्सवर आली आहे. (Forex Reserves)

(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : राज्य सरकारचा मोठा निर्णय; मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरित)

गेल्या ७ दिवसापूर्वी देखील भारताच्या तिजोरीत मोठी भर पडली होती. मोदी सरकारला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून २.६८ लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वर्षी मध्यवर्ती बँकेकडून केंद्राला २.१ लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश दिला होता. रुपया स्थिर ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून मोठ्या प्रमाणात अमेरिकन डॉलर्सची विक्री केली आहे. अशातच या विक्रीतून चांगले उत्पन्न आले आहे. तसेच लिक्विडीटी ऑपरेशन्स अंतर्गत बँकांना मोठ्या प्रमाणात निधी दिल्यानंतर त्याबदल्यात व्याजाच्या स्वरुपात आरबीआयला नफा झाला आहे. (Forex Reserves)

दरम्यान, मध्यवर्ती बँकेला चांगले उत्पन्न मिळाल्यानं केंद्राच्या मिळणाऱ्या लाभांशमध्ये वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेकडून मिळणारी रक्कम केंद्राच्या अर्थव्यवस्थेसाठी एक मोठा आधार आहे. चालू वर्षात सरकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अधिक पैसे खर्च करण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेकडून सरकारला मिळणारा लांभाश वित्तीय तूट कमी करण्यासाठी महत्त्वाचा आहे. लाभांशद्वारे निधी मिळाल्यास सरकारला कर्ज उभारण्याची गरज उरत नाही. (Forex Reserves)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.