Israel Hamas War : …अशी आशा ठेवणे आता शक्य नाही ; जयशंकर यांनी व्यक्त केली चिंता

पश्चिम आशियामध्ये काय घडत आहे, याचा परिणाम अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेला नाही. जगातील विविध युद्धांचे परिणाम जवळच्या भौगोलिक क्षेत्रांच्या पलीकडेही जाणवत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही, असे एस. जयशंकर म्हणाले.

22
Israel Hamas War : ...अशी आशा ठेवणे आता शक्य नाही ; जयशंकर यांनी व्यक्त केली चिंता
Israel Hamas War : ...अशी आशा ठेवणे आता शक्य नाही ; जयशंकर यांनी व्यक्त केली चिंता

एकीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, तर दुसरीकडे इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. (Israel Hamas War) या देशांमधील युद्धाचा परिणाम जगभरात कोणत्या ना कोणत्या प्रकारे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संभाव्य धोक्यांविषयी सतर्क केले आहे. ‘युद्ध आणि दहशतवादाचे दुष्परिणाम थांबवता येतील, अशी कोणतीही आशा ठेवणे आता शक्य नाही. पश्चिम आशियामध्ये काय घडत आहे, याचा परिणाम अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेला नाही. जगातील विविध युद्धांचे परिणाम जवळच्या भौगोलिक क्षेत्रांच्या पलीकडेही जाणवत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही’, असे एस. जयशंकर म्हणाले. परराष्ट्रमंत्री रविवारी एका परिषदेला संबोधित करत होते. (Israel Hamas War)

(हेही वाचा – DRI : संभाजी नगर मधून २५० कोटींचे अमली पदार्थ जप्त, अहमदाबाद पोलिस आणि डीआरआय ची कारवाई)

दहशतवादाचा प्रभाव थांबवता येत नाही 

विविध प्रकारच्या हिंसाचाराला सामोरे जाण्याच्या आव्हानांबाबतही जयशंकर यांनी भाष्य केले. “मी दहशतवादाबद्दल बोलत आहे. बऱ्याच देशांनी दहशतवादाला राज्यकारभाराचे साधन म्हणून विकसित केले आहे. संघर्ष आणि दहशतवादाचे दुष्परिणाम टाळता येतील, अशी कोणतीही आशा आता शक्यता नाही. कोणताही धोका फार दूर नाही. कोणत्याही युद्धाचा सर्वांत मोठा भाग अर्थातच आर्थिक असतो. जेव्हा कट्टरतावाद आणि अतिरेकीपणाचा प्रश्न येतो, तेव्हा त्याचा अन्यत्र प्रसार होण्याच्या धोक्याला कमी लेखले जाऊ शकत नाही.” (Israel Hamas War)

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध दिवसागणिक वाढत आहे. इस्रायली लढाऊ विमानांनी रात्रभर आणि रविवारी संपूर्ण गाझामध्ये अनेक लक्ष्यांवर हल्ला केला. त्याने सीरियातील दोन विमानतळ आणि ताब्यात घेतलेल्या वेस्ट बँकमधील अल-अक्सा मशिदीला देखील उडवले, जिथे दहशतवादी लपून बसले होते. दोघांमधील युद्ध दोन आठवड्यांहून अधिक काळापासून सुरू आहे आणि असे मानले जाते की इतर आघाड्यांवरही युद्ध सुरू होऊ शकते. या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्र्यांनी हा इशारा दिला आहे. (Israel Hamas War)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.