प्रतिनिधी
Foreign investment : महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशपातळीवर आपले नेतृत्व सिद्ध करत आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात 1,64,875 कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. देशात आलेल्या एकूण 4,21,929 कोटी रुपयांपैकी तब्बल 40 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रातच झाली असून, राज्याने देशात आघाडीच नव्हे तर स्वतःच्या विक्रमालाही मागे टाकले आहे. (Foreign investment)
(हेही वाचा – स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने Research Scholarships जाहीर)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी ही माहिती दिली आहे. “महाराष्ट्र हे परकीय गुंतवणूकदारांची प्रथम पसंती ठरत आहे”, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत राज्यात यंदा 32 टक्क्यांनी अधिक गुंतवणूक झाल्याची नोंद आहे.
9 महिन्यांतच विक्रमी गुंतवणुकीचा उच्चांक!
2024-25 आर्थिक वर्षाच्या (2024-25 economic year) केवळ पहिल्या 9 महिन्यांतच महाराष्ट्राने मागील 10 वर्षांतील सर्वोच्च परकीय गुंतवणूक प्राप्त केली आहे. जानेवारी ते मार्च 2025 या तिमाहीत एकट्या 25,441 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, महाराष्ट्रातील उद्योगविश्वासाठी (maharashtra industry) हे वर्ष ऐतिहासिक ठरले आहे.
नेतृत्व आणि धोरणांचा विजय – मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या यशाचे श्रेय राज्य सरकारच्या ठोस धोरणांन, उद्योगासाठी अनुकूल वातावरण निर्मितीला आणि महाराष्ट्रातील उद्योजकता परंपरेला दिले. “जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन,” असे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde), अजित पवार (Ajit Pawar), उद्योग मंत्री उदय सामंत (Industry Minister Uday Samant) आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या कार्यक्षम नेतृत्वाचे कौतुक केले.
(हेही वाचा – Pune Porsche Accident प्रकरणात रक्ताचे नमुने बदलणाऱ्या Dr. Ajit Taware ला आता किडनी रॅकेटमध्ये अटक)
मागील दशकातील गुंतवणुकीचा आढावा (कोटी रुपयांत):
आर्थिक वर्ष | परकीय गुंतवणूक |
---|---|
2015-16 | ₹61,482 कोटी |
2016-17 | ₹1,31,980 कोटी |
2017-18 | ₹86,244 कोटी |
2018-19 | ₹57,139 कोटी |
2019 (एप्रि-ऑक्टो) | ₹25,316 कोटी |
2020-21 | ₹1,19,734 कोटी |
2021-22 | ₹1,14,964 कोटी |
2022-23 | ₹1,18,422 कोटी |
2023-24 | ₹1,25,101 कोटी |
2024-25 | ₹1,64,875 कोटी |
‘महाराष्ट्र मॅजिक’ देशात चमकतेय!
या विक्रमी यशामुळे महाराष्ट्र देशात उद्योग, गुंतवणूक आणि विकासाचे केंद्रबिंदू ठरत असून, भविष्यातही राज्यात आणखी गुंतवणुकीचा ओघ सुरू राहणार असल्याचे संकेत आहेत. ‘मेक इन महाराष्ट्र’ आणि ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ या उपक्रमांचे फलित म्हणून राज्याला जागतिक व्यासपीठावर नवा आत्मविश्वास मिळाला आहे.
(हेही वाचा – Asian Athletics Championship : आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मिश्र रिले संघाला ऐतिहासिक सुवर्ण)
हेही पहा –