MHADA : म्हाडाच्या मास्टर लिस्टवरील सदनिकाधारकांना मिळणार मूळ जागेपेक्षा अधिक गाळा, पण त्यासाठी मोजावी लागणार ही किंमत

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील बृहतसूची अर्थात मास्टर लिस्ट वरील गाळे वाटपाच्या धोरणात बदल करण्यात आला असून नवीन धोरणानुसार मूळ गाळ्याच्या क्षेत्रफळापेक्षा १०० चौ. फुट अतिरिक्त क्षेत्रफळाचा गाळा लाभार्थ्यांना देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

195
MHADA : म्हाडाच्या मास्टर लिस्टवरील सदनिकाधारकांना मिळणार मूळ जागेपेक्षा अधिक गाळा, पण त्यासाठी मोजावी लागणार ही किंमत
MHADA : म्हाडाच्या मास्टर लिस्टवरील सदनिकाधारकांना मिळणार मूळ जागेपेक्षा अधिक गाळा, पण त्यासाठी मोजावी लागणार ही किंमत

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील बृहतसूची अर्थात मास्टर लिस्ट वरील गाळे वाटपाच्या धोरणात बदल करण्यात आला असून नवीन धोरणानुसार मूळ गाळ्याच्या क्षेत्रफळापेक्षा १०० चौ. फुट अतिरिक्त क्षेत्रफळाचा गाळा लाभार्थ्यांना देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मूळ गाळा निशुल्क असून अतिरिक्त १०० चौ. फुटाकरिता रेडिरेकनरच्या १२५ टक्के दराने अधिमूल्याची आकारणी करून वितरित करण्यात येणार आहे. तसेच यापुढे या गाळ्यांचे वितरण संगणकीय सोडत पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सोमवार, १३ नोव्हेंबर रोजी दिली. (MHADA)

मास्टर लिस्ट वरील गाळे वाटपाच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी म्हाडातर्फे जुन्या कार्यप्रणालीत बदल करून नागरिकांचा विश्वास संपादन करण्याच्या उद्देशाने मास्टर लिस्ट वरील गाळे वाटपाच्या धोरणात बदल करण्यात आले असल्याचे संजीव जयस्वाल यांनी संगितले. नवीन धोरणानुसार मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे लाभार्थ्यास निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्रफळाचा गाळा वितरण करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल. मात्र मंडळाकडे लाभार्थ्याला निश्चित क्षेत्रफळाचा गाळा उपलब्ध न झाल्यास, मास्टर लिस्ट वरील लाभार्थ्यास अतिरिक्त १०० चौ. फुटा करिता रेडिरेकनरच्या १२५ टक्के दराने अधिमूल्याची आकारणी करून देण्यात येणार आहे. त्यापेक्षा अधिक मोठ्या आकारमानाचा गाळा मंडळातर्फे उपलब्ध करवून देण्याची प्रक्रिया यापुढे संपुष्टात आली आहे. तसेच या नियम जास्तीत जास्त ७५० चौ. फुटांच्या गाळ्यांकरिता लागू केला जाईल, असे नवीन नियमावलीमध्ये नमूद करण्यात आले आहे. (MHADA)

मंडळातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या बृहतसूची समितीने प्राप्त अर्ज व कागदपत्रांची पडताळणी करून व सुनावणी देऊन अर्जदारांची पात्रता निश्चिती केली जाते. नवीन नियमावलीनुसार सर्व पात्र अर्जदारांना गाळ्याचे वाटप यापुढे म्हाडाच्या IHLMS २.० म्हणजेच एकात्मिक गृहनिर्माण सोडत व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातून संगणकीय सोडत पद्धतीने जाहीर करण्यात येणार असल्याचे जयस्वाल यांनी सोमवारी जाहीर केले. भाडेकरू तथा रहिवाश्यांच्या मूळ गाळ्याच्या चटई क्षेत्र फळानुसार संगणकीय प्रणालीमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. IHLMS २.० प्रणालीच्या RAT म्हणजेच (Random Allocation of Tenement ) या संगणकीय आज्ञावलीच्या माध्यमातून बृहतसूची वरील पात्र अर्जदारांना मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील पुनर्रचित इमारतींमधील मालकी तत्वावर दिल्या जाणार्‍या नवीन गाळ्याचा क्रमांक व मजला निश्चित करण्यात येणार आहे. यामुळे मास्टर लिस्ट वरील गाळे वाटपाच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता, पारदर्शकता प्रस्थापित होण्यास मदत निश्चित होईल, असा विश्वास जयस्वाल यांनी यावेळी व्यक्त केला. (MHADA)

(हेही वाचा – Nitesh Rane : रोहित पवारांच्या विधानावर नितेश राणेंची खोचक टीका; म्हणाले…)

मास्टर लिस्टवर कधी आपले नाव येते?

पुनर्रचित इमारतींमध्ये नवीन गाळ्यांचे मालकी तत्वावर वितरण करण्यात येते. अरुंद भूखंड किंवा विविक्षित आरक्षणांमुळे भूखंड बाधित झाले असल्यास जुन्या इमारतींच्या ठिकाणी पुनर्रचित इमारत बांधणे शक्य होत नाही. अशा बाधित इमारतींच्या रहिवाश्यांना बृहत सूची समितीद्वारे जाहिरात देऊन अर्ज मागविले जातात व पात्र रहिवाश्यांना बृहत सूचीमध्ये समाविष्ट करून इतरत्र पुनर्रचित इमारतींमधील अतिरिक्त गाळ्यांचे वाटप मालकी तत्वावर केले जाते. त्याचप्रमाणे, विकास नियंत्रण नियमावली ३३/७ व ३३/९ अंतर्गत खाजगी विकसकांकडून ना हरकत प्रमाण पत्रांतर्गत प्राप्त झालेल्या सदनिका/गाळे ही बृहतसूचीवरील पात्र भाडेकरू/रहिवाशी यांना मालकी तत्वावर वितरित केल्या जातात. (MHADA)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.