Bangladeshi Infiltrators : त्रिपुरात ५ बांगलादेशी घुसखोरांना एजंटसह केली अटक

अटक केलेले बांगलादेशी (Bangladeshi Infiltrators) बेकायदेशीरपणे भारतात घुसले होते आणि ते रेल्वेने दिल्लीला जाण्याचा विचार करत होते.

39
त्रिपुरातील आगरतळा रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी ५ बांगलादेशी घुसखोरांना (Bangladeshi Infiltrators) अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी, ७ जून २०२५ या दिवशी रात्री करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये २ अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. हे सर्वजण रेल्वेने दिल्लीला जाण्याचा विचार करत होते.

अगरतळा सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपीएस) चे प्रभारी अधिकारी तापस दास यांनी सांगितले की, जीआरपी, रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) आणि गुप्तचर विभागाच्या संयुक्त कारवाईत त्यांना (Bangladeshi Infiltrators) अटक करण्यात आली. अटक केलेले बांगलादेशी (Bangladeshi Infiltrators) बेकायदेशीरपणे भारतात घुसले होते आणि ते रेल्वेने दिल्लीला जाण्याचा विचार करत होते. याशिवाय, त्याच दिवशी आगरतळा रेल्वे स्थानकावरून आणखी एक बांगलादेशी घुसखोर आणि एका भारतीय दलालालाही ताब्यात घेण्यात आले. आगरतळा जीआरपी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू करण्यात आला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.