मुंबईत पहिली Vedic School सुरु; मुलांची आध्यात्मिक विकासासह शैक्षणिक प्रगती होणार

मारवाडी वैष्णव समाजाच्या माध्यमातून 'संभव' नावाने ही (Vedic school) शाळा मुंबईतील गिरगाव येथील खेतवाडी गल्ली क्रमांक १२, ग्रॅन्ट रोड येथे सुरु होत आहे.

1132

जर प्ले ग्रुप, नर्सरी, छोटा शिशु, मोठा शिशुमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांना प्रगत शिक्षणासोबत त्यांच्यावर आध्यात्मिक संस्कार होत असेल तर मुलांचा सर्वांगिण विकास निश्चित आहे. अशी शाळा शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून सुरु होत आहे. मुंबईत अशा स्वरूपाची शाळा अनेकांना आकर्षित करणारी ठरेल. अशी पहिली Vedic school शाळा मुंबईत सुरु होणार आहे.

मारवाडी वैष्णव समाजाच्या माध्यमातून ‘संभव’ नावाने ही (Vedic school) शाळा मुंबईतील गिरगाव येथील खेतवाडी गल्ली क्रमांक १२, ग्रॅन्ट रोड येथे सुरु होत आहे. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी २ ते ५ अशी वयोमर्यादा असणार आहे. प्रवेश घेणाऱ्या मुलांची आणि पालकांची मुलाखत घेण्यात येणार आहे. त्यामध्ये मुलांची आणि पालकांची या पद्धतीच्या शिक्षणासाठी रुची आहे का, हे पडताळूनच प्रवेश दिला जाणार आहे. वार्षिक ४५ हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

(हेही वाचा Conversion : ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या ६ कुटुंबांना गावकऱ्यांनी दिले हाकलून)

या  (Vedic school) शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांना अध्यात्मिक, शैक्षणिक, कला, कौशल्य विकास आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण अशा टप्प्यांत शिक्षण दिले जाणार आहे. यात मुलांना इंग्रजी, गणित, भाषा अशा नेहमीच्या शिक्षणासोबत रामायण, महाभारत, गीता, महापुरुषांचे चरित्र इत्यादी शिकवले जाणार आहे. याशिवाय त्यांना योगा, ध्यान धारणाही शिकवली जाणार आहे. मुलांचे आत्मबल वाढावे यासाठी त्यांना स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे. (Vedic school) या शाळेविषयी आणि प्रवेश प्रक्रियेसंबंधी अधिक माहिती घेण्यासाठी अधिवक्ता अश्विन पीराराम पुरोहित यांना 9867939317 किंवा 9868506803 या क्रमांकावर संपर्क करावा.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.