-
प्रतिनिधी
मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर सोमवारी दुपारी अचानक आग (Fire) लागल्याने एकच खळबळ उडाली. प्रवेशद्वारापाशी लावलेल्या स्कॅनिंग मशिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचे समोर आले असून, घटनेची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिकृतपणे दिली आहे.
आगीची (Fire) तीव्रता लक्षात घेता, काही काळ परिसरात धावपळ आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने ही आग फक्त प्रवेशद्वारापुरतीच मर्यादित राहिली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही बाब सर्वांना दिलासा देणारी ठरली.
(हेही वाचा – ‘Operation Sindoor’ची माहिती जगभर पोहोचविण्यास तृणमूल खासदार युसूफ पठाण यांचा नकार)
घटनेच्या वेळी विधानमंडळाच्या विविध समित्यांचे उद्घाटन सुरु होते. कार्यक्रम सुरळीत पार पडल्याची माहिती आहे. आमदार त्या वेळेस जेवणासाठी गेले होते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र ही घटना गेट परिसरात घडल्याने तात्काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले.
या आगीमुळे (Fire) विधानभवनातील सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून, उच्च सुरक्षा असलेल्या परिसरात शॉर्ट सर्किट होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तसेच, संपूर्ण विधानभवनातील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तांत्रिक तपासणी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. वेळेवर हस्तक्षेप झाल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी, ही घटना सुरक्षा व्यवस्थेबाबत सतर्कतेचा गंभीर इशारा देऊन गेली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community