Fire : दिल्लीतील बहुमजली इमारतीला भीषण आग; तिघांचा मृत्यू

264
Fire : दिल्लीतील बहुमजली इमारतीला भीषण आग; तिघांचा मृत्यू

दिल्लीतील द्वारका परिसरात एका बहुमजली इमारतीला आग (Fire) लागून मोठी दुर्घटना घडली आहे. या आगीच्या विळख्यात काही कुटुंब सापडली. दरम्यान, आगीपासून बचाव करण्यासाठी एका कुटुंबातील काही जणांनी वरून खाली उड्या मारल्याने तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये एक मुलगा, एक मुलगी आणि त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.

(हेही वाचा – हिंदू धर्माविरुद्ध आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट; Wazahat Khan याच्याविरोधात गुन्हा दाखल)

अग्निशमन दलाने या आगीबाबत (Fire) दिलेल्या अधिक माहितीनुसार, दिल्लीतील द्वारका सेक्टर-१३ मधील एका इमारतीमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली होती. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग शमवण्याचं काम सुरू केलं. मात्र ही आग एवढी भयानक होती की, त्यामध्ये संपूर्ण इमारत वेढली गेली. या आगीच्या विळख्यात सापडल्याचं पाहिल्यानंतर सातव्या मजल्यावर राहणारं एक कुटुंब घाबरलं. या कुटुंबातील भाऊ-बहीण आणि वडिलांनी सातव्या मजल्यावरून खाली उडी मारली.

(हेही वाचा – रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्स आठ दिवसांत हटवा, अन्यथा कारवाई करु ; Avinash Jadhav यांचा इशारा)

या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या या तिघांनाही रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यश यादव असं या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचं नाव आहे. ते पेशाने व्यावसायिक होते. या आगीमधून (Fire) यश यादव यांची पत्नी आणि मोठा मुलगा मात्र सुदैवाने बचावले. त्यांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.