Fire : वसईत भीषण आग; कंपनी जळून खाक

228

वसईत खेळणी बनविणाऱ्या शैलेश इंडस्ट्रियल कंपनीला भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली. गुरुवारी, २१ मार्च रोजी साडेबाराच्या सुमारास ही आग लागली. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. या आगीच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. या आगीची मिळताच अग्निशमन दलाचे ५ अग्निबंब घटनास्थळी पोहोचले आहेत. कंपनीला नेमकी आग कशी लागली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

(हेही वाचा Rohingya Muslims  : रोहिंग्यांना निर्वासित म्हणून स्वीकारणे राष्ट्रीय सुरक्षेस धोक्याचे; केंद्राचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र )

मिळालेल्या माहितीनुसार, वसईत खेळणी बनवणाऱ्या शैलेश इंडस्ट्रियल कंपनीला भीषण आग लागली. आज गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. आग लागल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे पाच अग्निबंब घटनास्थळी पोहोचले. या भीषण आगीत संपूर्ण कंपनी जळून (Fire) खाक झाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. या घटनेत कोणती जिवीतहानी झालेली नाही.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.