रत्नागिरीतील महिला प्राध्यापकाचे Pahalgam Terror Attack बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; हिंदुत्ववादी संघटनांनी खडसावले

98

रत्नागिरी (Ratnagiri) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (Ratnagiri Government Engineering College) पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याविषयी (Pahalgam Terror Attack) आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या महिला प्राध्यापकाला हिंदुत्ववादी संघटना आणि संविधान सन्मान मंच यांनी खडसावले. तसेच या प्राध्यापिकेला निलंबित करण्याची मागणी प्राचार्यांकडे करण्यात आली आहे.

(हेही वाचा – चौंडीतील विशेष Cabinet Meeting ऐतिहासिक निर्णय : अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव, ग्रामीण विकासाला गती )

महाविद्यालयात ‘संविधान’ हा विषय दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या महिला प्राध्यापिका सुवर्णा दारोकार यांनी गेल्या आठवड्यात मुलांना वर्गाचा दरवाजा बंद करून पहलगाम हल्ला, भारतातील जातीपाती (Casteism), भेदभाव, मनुस्मृती (Manusmriti), स्त्रियांना हिंदू धर्मामध्ये दिला जाणारा दर्जा, सती प्रथा आणि मुस्लीम ट्रस्ट या विषयावर बोलतांना आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याची माहिती हिंदुत्ववादी संघटनांना मिळाली. पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झालाच नाही. आपण ते काही बघायला तिकडे नव्हतो. मीडियाद्वारे खोट्या बातम्या पटापट पसरवल्या गेल्या, असे वक्तव्य सुवर्णा दारोकार यांनी केल्याच्या तक्रारी हिंदू संघटनांसमोर आल्या.

याची तात्काळ दखल घेत हिंदुत्वावादी संघटनांच्या प्रतिनिधींनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय गाठले आणि प्राचार्यांना वस्तुस्थिती विचारली. त्यानंतर संबंधित महिला प्राध्यापिका प्राचार्या सुवर्णा दारोकर यांनाही बोलवण्यात आले. ‘आपण असे काही बोललोच नाही’, असे त्या म्हटल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना बोलावून समोरासमोर गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या. त्या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांनी अशी वक्तव्ये केल्याचे प्राचार्य आणि हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमोर सांगितले.

अशा प्रकारे वक्तव्ये करणे, हा देशाचा अपमान आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) अशी वक्तव्ये केल्याने त्याचे गांभीर्य कमी होते, अशी भूमिका हिंदुत्ववाद्यांनी मांडली. यानंतर या महिला प्राध्यापकांच्या निलंबनाची मागणी प्राचार्यांकडे करण्यात आली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.