आसाममधील (Assam) लखीमपूर (Lakhimpur) येथे शनिवार, १४ जून २०२५ या दिवशी काली मंदिराच्या जवळ पुन्हा गोमांस फेकल्याची घटना घडली. ज्यामुळे परिसरात जातीय तणाव वाढला आहे. इस्लामिक कट्टरवाद्यांनी गाईचे कापलेले शिर मंदिर परिसरात फेकले. (Kali temple in Assam)
पोलिसांना याची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि गाईचे कापलेले शिर ताब्यात घेतले. तसेच पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला, जेणेकरून तणाव वाढू नये.
(हेही वाचा – Meta AI Video Editing : फेसुबकवर आता एआयच्या मदतीने व्हिडिओही होणार एडिट)
या प्रकरणी पोलिसांनी ५ इस्लामिक कट्टरवाद्यांना अटक केली आहे. बोदिर अली, हजरत अली, तारा मिया, शजामल मिया आणि जहांगीर आलम अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या इस्लामिक कट्टरवाद्यांची नावे आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी स्वतः त्यांच्या ट्विटर (एक्स) अकाऊंटवर या घटनेची माहिती दिली.
Lakhipur Police of Goalpara District has arrested the following individuals for allegedly throwing beef near a temple in a deliberate attempt to incite communal tension post Eid-ul-Zuha:
1.Bodir Ali (57), S/o Late Jabber Ali
2.Hazarat Ali (58), S/o Riaj Uddin
3.Tara Mia (36),…— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) June 15, 2025
स्थानिक हिंदूंचे म्हणणे आहे की, ही काही नवीन गोष्ट नाही. यापूर्वीही मुस्लिम अतिरेक्यांनी वॉर्ड क्रमांक १० मधील मंदिर परिसरात गोमांस फेकले होते. त्या वेळीही लोकांनी खूप विरोध केला, तेव्हा कुठे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला.
यापूर्वी शुक्रवार, १३ जून २०२५ या दिवशीही मुस्लिमबहुल धुब्री (Dhubri) परिसरात एका स्थानिक हनुमान मंदिरात एका गाईचे कापलेले शिर सापडले होते. यानंतर तिथेही विरोध प्रदर्शन सुरू झाले. तणाव इतका वाढला की, मुख्यमंत्र्यांना तिथे भेट द्यावी लागली.
मुख्यमंत्र्यांनी लोकांना आश्वासन देताना दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि दोषींना थेट गोळी मारण्याचे आदेश जारी केले. तथापि धुब्री घटनेवर पोलिसांच्या रात्रभर चाललेल्या तपासात एकूण ३८ लोकांना अटक करण्यात आली.
असममध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मुस्लिम अतिरेक्यांकडून हिंदू मंदिरांना लक्ष्य करून वारंवार गोमांस फेकण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि हिंदूंच्या आस्थेचा अपमान केला जात आहे. (Kali temple in Assam)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community