Exam Date : शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी JEE, NEET, NET सह इतर परीक्षांच्या तारखा जाहीर

232
Exam Date : शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी JEE, NEET, NET सह इतर परीक्षांच्या तारखा जाहीर

नॅशनल टेस्टिंग एजन्सी, म्हणजेच NTA ने पुढील शैक्षणिक वर्षातील महत्त्वाच्या परीक्षांच्या तारखा (Exam Date) जाहीर केल्या आहेत. यामध्ये जेईई, नीट आणि सीयूईटी अशा कित्येक परीक्षांचा समावेश आहे. 2024-25 वर्षासाठीचं हे वेळापत्रक असणार आहे.

एनटीएने एका ट्विटर पोस्टच्या माध्यमातून (Exam Date) याबाबत माहिती दिली आहे. यानुसार, जेईई मेन सेशन 1 (JEE Main) हे 24 जानेवारी 2024 ते 1 फेब्रुवारी 2024 या दरम्यान होणार आहे. तर जेईई मेन सेशन 2 हे 1 एप्रिल 2024 ते 15 एप्रिल 2024 या दरम्यान पार पडेल.

NEET

नॅशनल एलिजिब्लिटी कम एन्ट्रान्स टेस्ट (NEET-UG), जी पेन टू पेपर/ओएमआर फॉरमॅटमध्ये घेतली जाते, ती 5 मे 2024 रोजी पार पडेल. या परीक्षेचा निकाल (Exam Date) जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लागेल, असंही सांगण्यात आलं आहे.

(हेही वाचा – Mohammed Shami : अखेर मोहम्मद शामीला जामीन मंजूर; पत्नीचा छळ केल्याच्या प्रकरणात जामीन मंजूर)

CUET

कॉमन युनिवर्सिटी एन्ट्रान्स टेस्ट (CUET) याची यूजी आणि पीजी परीक्षा ही वेगवेगळी (Exam Date) घेण्यात येणार आहे. CUET-UG ही परीक्षा 15 मे ते 31 मे 2024 दरम्यान पार पडेल. तर, CUET-PG ही परीक्षा 11 ते 28 मार्च दरम्यान पार पडेल.

NET

यूजीसी-नेट (UGC NET) परीक्षा ही 10 जून ते 21 जून 2024 या दरम्यान घेतली जाणार आहे. असिस्टंट प्रोफेसरशिप आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी ही परीक्षा घेतली जाते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.