महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमएमओसीएल) ने मेट्रो आणि मोनोरेल स्थानकांवर इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी स्वॅपिंग स्टेशनची सुविधा सुरू करण्यात येणार असून, दहिसर पूर्व मेट्रो स्थानकावर या उपक्रमाचा पहिला प्रकल्प नुकताच कार्यान्वित करण्यात आला आहे. (EV Battery Stations)
(हेही वाचा – Pakistani Spy : 3 वेळा पाकिस्तानात जाणाऱ्या पंजाबमधील आणखी एक युट्यूबरला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक ; ज्योती-दानिशशीही संबंध)
हा उपक्रम एमएमएमओसीएलने होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया या जपानी कंपनीसोबत भागीदारीत सुरू केला आहे. या सुविधेमुळे ई-वाहनचालक केवळ दोन मिनिटांत चार्ज झालेली बॅटरी घेऊन पुढील प्रवास सुरू करू शकतील. या नव्या सेवेमुळे फ्लीट ऑपरेटर, डिलिव्हरी एजंट्स आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. (EV Battery Stations)
(हेही वाचा – IPL 2025, RCB Champions : श्रेयस अय्यर बाद झाल्यावर विराटने मारलेली उडी व्हायरल,)
या उपक्रमातून एमएमएमओसीएल ला सुमारे ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, ही सुविधा मुंबईत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवेल आणि प्रदूषणविरहित नागरी जीवनशैलीस मदत करेल. महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी या योजनेचे कौतुक करताना सांगितले की, लवकरच मुंबईतील आणखी ३० ठिकाणी अशी बॅटरी स्वॅपिंग केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. ही सुविधा म्हणजे मुंबईच्या पर्यावरणपूरक आणि शाश्वत वाहतुकीकडे टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. (EV Battery Stations)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community