Environment: संवर्धन ही काळाची गरज: ॲड. नितीन ठाकरे

111
Environment: संवर्धन ही काळाची गरज: ॲड. नितीन ठाकरे

पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. आज तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. याला कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड व कमी झालेली वृक्ष लागवड. त्यामुळे वृक्ष संवर्धन करून निसर्गाचा समतोल राखणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे (Adv. Nitin Thackeray) यांनी केले. (Environment)

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) मविप्र संचलित जन शिक्षण संस्थानच्या वतीने नाशिक मध्यवर्ती कारागृह (Nashik Central Jail) येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जन शिक्षण संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर होते. (Environment)

(हेही वाचा – Modi 3.0 : नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाची हॅटट्रीक; राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळ्याला सुरुवात)

जन शिक्षण संस्थानच्या संचालिका ज्योती लांडगे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी नाशिकरोड खुले कारागृह येथे संकल्प प्रोजेक्ट अंतर्गत सुरु असलेल्या रोपवाटीका व मधुमक्षिका पालन प्रशिक्षणाची माहिती दिली. कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटराव यांनी जनशिक्षण संस्थानच्या संकल्प प्रोजेक्टचे कौतुक करत पर्यावरण दिनाचे महत्व विषद केले. कौशल्य विकास व उद्योजकता उपआयुक्त सुनील सैंदाणे यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता वृक्ष संवर्धनाची गरज आहे, असे सांगितले. जन शिक्षण संस्थानमार्फत मध्यवर्ती कारागृह अभ्यासिकेला ”औषध तुमच्या दारी” (Medicine at your door) या पुस्तकाच्या प्रति भेट देण्यात आल्या. (Environment)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.