BMC : निवडणूक कामांसाठी अभियंत्यांनाही जुंपले, सेवा सुविधांसह पायाभूत प्रकल्पांच्या कामांवर होणार परिणाम

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची यापूर्वीपासून निवडणूक कामांसाठी मदत घेतली जात असून मतदार यादी सुधारीत करणे तसेच नवीन मतदार शोधणे शिवाय शतायुषी मतदार शोधणे आदीप्रकारची कामे यापूर्वीपासून सुरु आहेत. त्यामुळे या कामांसाठी निवडक कर्मचारी यापूर्वीच गेलेले असले तरी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर अणि उपनगराच्या जिल्हाधिकारींनी महापालिकेच्या सुमारे २५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची निवडणूक कामांसाठी मागणी केली आहे.

1521
BMC Ashray Yojana : देवनार येथील सफाई कामगारांच्या बैठ्या चाळींच्या जागी आता कब्रस्तान

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता निवडणूक कामांसाठी महापालिका कर्मचाऱ्यांच्या (Municipal employees) नेमणुका व्हायला लागल्या असून यंदापासून अभियंत्यांनाही या निवडणूक कामांना जुंपण्यात आले आहे. या निवडणूक कामांसाठी आजवर आपत्कालिन विभागांमधील कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या काढल्या जात नव्हत्या, परंतु यंदा आपत्कालिन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह अभियंत्यांनाही निवडणुकीच्या कामांसाठी नियुक्ती करण्यात आल्याने मुंबईतील अनेक पायाभूत विकास प्रकल्पांसह अनेक प्रकल्पांची तसेच सेवा सुविधांची कामे रखडली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. (BMC)

मुंबई महापालिकेच्या (BMC) कर्मचाऱ्यांची यापूर्वीपासून निवडणूक कामांसाठी मदत घेतली जात असून मतदार यादी सुधारीत करणे तसेच नवीन मतदार शोधणे शिवाय शतायुषी मतदार शोधणे आदीप्रकारची कामे यापूर्वीपासून सुरु आहेत. त्यामुळे या कामांसाठी निवडक कर्मचारी यापूर्वीच गेलेले असले तरी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर अणि उपनगराच्या जिल्हाधिकारींनी महापालिकेच्या सुमारे २५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची निवडणूक कामांसाठी मागणी केली आहे. आजवर महापलिकेच्या (BMC) सामान्य प्रशासनाला कळवून त्यांच्या माध्यमातून निवडणूक कामांसाठी कर्मचाऱ्यांच्या नेमणुकी केल्या जायच्या, परंतु आता जिल्हाधिकारी कार्यालयांकडून थेट २४ विभाग कार्यालय आणि सर्व विभाग व खाते प्रमुखांना पत्र पाठवून अमुक एक कर्मचाऱ्यांची निवडणूक कामांसाठी नियुक्ती केली गेली आहे असे कळवले जात आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा निवडणूक कामांसाठी नियुक्त झालेला कर्मचारी तथा अधिकारी हा महत्वाचा असतो, त्यामुळे त्या कर्मचाऱ्याला खातेप्रमुख, विभागप्रमुख तसेच सहायक आयुक्तांनी न सोडल्यास पोलिस बळाचा वापर करून त्या नियुक्त कर्मचाऱ्याला निवडणूक कामांसाठी नेले जात आहे. त्यामुळे एकप्रकारे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे आणि पोलिस येऊन घेऊन जाण्याऐवजी स्वत: निमुटपणे ते या कामांसाठी निघून जात आहेत. (BMC)

(हेही वाचा – Farmers Protest In Delhi : पंजाबच्या सीमेवर शेतकरी आक्रमक, पोलिसांवर केली दगडफेक; दिल्लीच्या सीमांवर वाहतूक कोंडी)

प्रकल्प कामांवरही परिणाम होण्याची भीती

महापालिकेच्या (BMC) प्रत्येक विभाग कार्यालयांमधून कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता, सहायक अभियंता यांच्या परस्पर ऑर्डर काढल्या गेल्या असून यामुळे विभाग स्तरावरील विविध सेवा सुविधांच्या कामांमध्ये परिणाम होण्याची शक्यता आहे. एकाबाजुला आर्थिक वर्ष सरले जात असल्याने ३१ मार्च पूर्वी निधी संपवण्यासाठी विविध विकासकामांना सुरुवात करणे आवश्यक असते. परंतु ही कामे आता या अभियंत्यांअभावी रखडली जाणार आहे आणि परिणामी यासाठीचा तरतूद केलेल्या निधीचा वापर होऊ शकणार नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (BMC)

तर या निवडणूक कामांसाठी रस्ते व पूल विभागासह पर्जन्य जलवाहिनी, मलवाहिनी तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागातील अभियंत्यांचेही निवडणूक कामांसाठी कार्यालयीन आदेश काढण्यात आले आहेत. रस्त्यांसह पुलांची कामे ही कंत्राटदारांमार्फत केली जात असली तरी यावर अभियंत्यांच्या माध्यमातून देखरेख ठेवली जाते. त्यामुळे या कामांवरील देखरेखही कमी होऊन या प्रकल्प कामांवरही परिणाम होण्याची भीती वर्तवली जात आहे. अभियंता हा तांत्रिक कर्मचारी असून निवडणूक कामांसाठी प्रशासकीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. त्यामुळे अभियांत्रिकी सेवेतील कर्मचाऱ्यांना वगळून हे आदेश बजावण्यात यायला हवे होते. तसेच म्हाडासह इतर सरकारी व निमसरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची सेवा न घेता जिथे थेट जनतेचा संबंध आहे त्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची जास्तीत जास्त सेवा घेणे हे एकप्रकारे पायाभूत प्रकल्प व सेवा सुविधांवर परिणाम करणारे असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (BMC)

(हेही वाचा – Swami Govind Dev Giri Maharaj : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने होणार प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा‘अमृत महोत्सव सन्मान सोहळा’)

महापालिकेचे पाच पट कर्मचाऱ्यांची मागणी निवडणूक कामांसाठी

महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या महापालिकेत (BMC) ९० हजार कर्मचारी असून अनेक पदे ही रिक्त आहे. ही रिक्त पदे भरली जात नाही. त्यातच २५ हजार कर्मचारी निवडणूक कामांसाठी गेल्यास आणि सफाई कामगारांमधील सुमारे ३० हजार कर्मचारी वगळल्यास महापालिकेकडे (BMC) ३५ हजार कर्मचारी शिल्लक राहता आणि त्यातील ५ हजार अधिकारी वगळल्यास ३० हजार कर्मचारी शिल्लक राहणार आहे. या ३० हजार कर्मचाऱ्यांकडून महापालिकेने कसे काम करावे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (BMC)

बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनचे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष यांनी याबाबत बोलतांना महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी निवडणूक आयुक्तांशी तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून अभियंते तसेच आपत्कालिन विभाग व खात्यांमधील कर्मचाऱ्यांची मदत निवडणूक कामांसाठी घेऊ नये अशाप्रकारची विनंती करायला हवी असे सांगितले. दरवेळच्या तुलनेत यंदा निवडणूक आयोगाने महापालिकेचे (BMC) पाच पट कर्मचाऱ्यांची मागणी निवडणूक कामांसाठी केली आहे. तसेच थेट खात्यांना आणि विभाग कार्यालयांना पत्र पाठवून ते ऑर्डर काढत आहेत. यामध्ये अभियंत्यांच्याही ऑर्डर काढल्या जात असून जलशुध्दीकरण केंद्रातील तसेच पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेसह कचरा व्यवस्थापन राखणाऱ्या विभागातील अभियंता तसेच अधिकाऱ्यांच्याही ऑर्डर काढल्या जात आहे. याचा परिणाम भविष्यात पाणी पुरवठा व स्वच्छतेवर होऊ शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे, तसेच अनेक सेवा सुविधांच्या कामांसह प्रकल्प कामेही रखडली जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.