Wife आणि सासरच्या जाचाला कंटाळून अभियंत्याने उचलले ‘हे’ पाऊल

माझी पत्नी (Wife) प्रिया माझ्यावर घर आणि जमीन तिच्या नावावर करण्यासाठी दबाव आणत होती, असे मोहित यादव यांनी म्हटले आहे.

159

उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात एका व्यक्तीने पत्नी (Wife) आणि सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या (Suicide) केली. याआधी त्याने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला,  ज्यामध्ये त्याने त्याच्या सर्व वेदना व्यक्त केल्या होत्या. मृताचे नाव मोहित कुमार उर्फ मोनू यादव असे आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला ज्यामध्ये त्याने त्याच्यावर आलेला प्रसंग सांगितला.

मोहितने त्याच्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ‘हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचेपर्यंत मी या जगात नसेन. जर मुलांसाठीही कायदा असता तर मी हे पाऊल उचलले नसते. माझी पत्नी (Wife) प्रिया माझ्यावर घर आणि जमीन तिच्या नावावर करण्यासाठी दबाव आणत होती आणि जर मी तसे केले नाही तर ती (Wife) मला खोट्या हुंड्याच्या प्रकरणात अडकवेल अशी धमकी दिली होती, असे मोहित या व्हिडिओत म्हणत होता. जर त्याला न्याय मिळाला नाही तर त्याची राख नाल्यात फेकून द्यावी, असेही मोहित म्हणाला.

(हेही वाचा कुराणचा अवमान केल्या प्रकरणात Wasim Rizvi यांची निर्दोष सुटका; काय होते प्रकरण?)

३३ वर्षीय मोनू यादव हा पुण्यातील एका सिमेंट कंपनीत अभियंता होता आणि तो औरैयाचा रहिवासी होता. गुरुवारी (१७ एप्रिल २०२५) मोहित इटावा रेल्वे स्टेशन बजरिया येथील जॉली हॉटेलमध्ये खोली क्रमांक १०१ मध्ये राहत होता. १९ एप्रिल २०२५ रोजी हॉटेल कर्मचाऱ्यांना तो त्याच्या खोलीत फाशीवर लटकलेला आढळला. एसपी सिटी अभयनाथ त्रिपाठी यांच्या मते, आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की मोहितने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ कॉलवर कोणाशी तरी बोलले होता, याची चौकशी केली जाईल. काही दिवसांपूर्वी बंगळुरूतील टेक कर्मचारी अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रमाणेच हे प्रकरणही समोर आले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.