Agricultural : कृषी क्षेत्रात रोजगार उपलब्ध; सुशिक्षित तरुणांना संधी 

131

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सरकार तंत्रज्ञानाचा विनियोग कृषी क्षेत्रात वाढवत असून प्रत्येक गावात पायाभूत सुविधांचा विकास करत आहे, ज्यामुळे कृषी क्षेत्रात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी गावातल्या सुशिक्षित तरुणांना आकर्षित करतील असं प्रतिपादन कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले आहे. तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांमुळे शेतकऱ्यांना लाभ होईल तसेच कृषी क्षेत्रातही सुधारणा होईल असे ते म्हणाले.

भारतीय स्वातंत्र्याचं शताब्दी वर्ष अर्थात “स्वातंत्र्याच्या अमृतकाळा’ पर्यंत भारतीय कृषी क्षेत्र जागतिक नेतृत्व म्हणून उदयास येईल. अमृत काळात जगाने भारतीय कृषी क्षेत्राचा गौरव करत इथे येऊन नवीन ज्ञान आत्मसात करू दे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असली पाहिजे. भारताला जगाच्या कल्याणासाठी आपली भूमिका बजावता आली पाहिजे असंही  तोमर म्हणाले. आयसीएआर अर्थात भारतीय कृषी संशोधन परिषदेने गेल्या 17 मार्च 2021 पासून सुरू केलेली 75 व्याख्यानमालेचा समारोप करताना ते बोलत होते.  विविध विषयांवरच्या या व्याख्यान मालिकेत अनेक तज्ञ, ज्येष्ठ वैज्ञानिक, धोरण निर्माते अध्यात्मिक नेते, प्रेरणादायी वक्ते आणि यशस्वी उद्योजक सहभागी झाले होते.

(हेही वाचा Seema Haidar : सीमा हैदरला पाकिस्तानमध्ये पाठवा अन्यथा…; मुंबई पोलिसांना धमकी)

समारोपाच्या सत्रात श्री तोमर यांनी स्वयंपूर्ण कृषी या विषयावर व्याख्यान दिल. कृषी क्षेत्राला सरकारकडून संपूर्ण सहाय्य आणि सहकार्य मिळण्याबाबत पंतप्रधान सातत्याने आश्वस्त करत असून त्यासाठीच अनेक योजना राबवल्या गेल्या आणि राज्य सरकारांच्या सहकार्याने हे काम सुरू आहे अस तोमर यांनी सांगितलं. भारतीय कृषीच्या विकासाचा प्रवास आणि यात आयसीएआरच्या योगदानाचा दाखला देत आज कृषी उत्पादनात भारत हा जगातल्या अग्रगण्य देशांमध्ये आहे अस तोमर म्हणाले.

आपल्यासह इतर देशांच्याही अन्नाच्या गरजा आपण भागवत आहोत असं त्यांनी सांगितले. भारत सरकार या कार्याला आणखी आणखी वेग देण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांनी स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करायला हवी. आयसीएआर आणि कृषी वैज्ञानिकांनी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अभूतपूर्व कार्य केल्याचे त्यांनी सांगितले नवीन बियाणांच संशोधन, ते शेतापर्यंत पोहोचवणे, उत्पादनात वाढ, नवीन तंत्रज्ञानाचा विकास करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं यासाठी त्यांनी ते अथक परिश्रम घेतले असून विविध प्रकारच्या हवामानात तग धरणाऱ्या आणि मजबूत बियाण्याचा प्रसारचाही यात समावेश आहे अशी माहिती त्यांनी दिली. वैज्ञानिकांनी अल्पावधीतच सर्व क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्यानं देशाला याचा लाभ मिळत आहे असे तोमर यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.