महापालिका शाळांच्या प्रांगणात हिरवळ आणि जैवविविधता वाढवण्यावर भर

166
महापालिका शाळांच्या प्रांगणात हिरवळ आणि जैवविविधता वाढवण्यावर भर
महापालिका शाळांच्या प्रांगणात हिरवळ आणि जैवविविधता वाढवण्यावर भर

मुंबई शहराच्या शाळांमध्ये हिरवळ आणि जैवविविधता वाढवणारे आणि प्रत्येकजण आनंद घेऊ शकतील अशा निरोगी आणि सावलीच्या जागा निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून प्रकल्प हाती घेण्याचा निर्धार महापालिकेच्या उद्यान विभागाने केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून एम/पूर्व विभागातील चिता कॅम्प येथील शहाजी नगर व‍िद्यालयात वृक्षारोपण करत खासगी संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (WRI) इंडिया यांच्यासमवेत मुंबई महापालिकेने गुरुवारी एम/पूर्व विभागातील चिता कॅम्प येथील शहाजी नगर व‍िद्यालयात वृक्षारोपण उपक्रमाचे उद्घाटन केले. मुंबईतील संवेदनशील वॉर्डामध्ये ‘ग्रीनिंग सोल्युशन्स’ सुरू करण्यासाठी भागीदार संस्थांसोबत महापालिकेचा सुरू असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग असून एम/पूर्व प्रभागापासून याची सुरुवात करण्यात येत आहे.

शाळेच्या जागेवर गवताची हिरवळ निर्माण करणे आणि त्यात वाढ करत राहणे, शालेय अभ्यासक्रमात जैवविविधता जागरूकता उपक्रम राबविणे, लागवड केलेल्या वनस्पतींचे संगोपन करणे आणि देखभाल करण्यासाठी इको-क्लब चालवणे तसेच एक लहान रोपवाटिका कार्यान्वित करणे आदींचा या उपक्रमात समावेश आहे.

(हेही वाचा- पुढील तीन महिन्यांत ३५०० गिरणी कामगार आणि वारसांना घरांचा ताबा; ‘मेंटेनन्स’ आकारणार १ जुलै २०२३ पासूनच)

डब्ल्यूआरआय इंडिया, टीआयएसएस, उद्यान विभाग आणि महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रतिनिधी तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि इतर देखभाल करणाऱ्या कर्मचार्‍यांसह उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी हे या उद्घाटनात सहभागी झाले होते. शालेय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या पाठिंब्याने हिरवळ वाढवणे आणि स्थानिक जैवविविधतेबद्दल जागरूकता निर्माण करणे या दोन्हींना प्रोत्साहन देणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

“शाळा ही वैज्ञानिक दृष्टीने हरितीकरण शिकण्यासाठी त्याचे संगोपनासाठी कार्यशाळा कशा असू शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. शहराच्या शाळांमध्ये हिरवळ आणि जैवविविधता वाढवणारे, प्रत्येकजण आनंद घेऊ शकतील अशा निरोगी आणि सावलीच्या जागा निर्माण करणारे असे आणखी प्रकल्प करण्याचा आमचा मानस असल्याचे महापालिका उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी स्पष्ट केले,

हा उपक्रम उष्णता आणि पुराच्या जोखमीसाठी सर्वात असुरक्षित असलेल्या वॉर्डांमध्ये हिरवळ वाढवण्याचा एक भाग आहे. दाट वस्ती असलेल्या भागात शाळा, मोकळ्या जागा, संस्थात्मक इमारती वनस्पती वाढवण्याची आणि सावली देण्यासाठी संधी देतात असे डब्ल्यूआरआय इंडियाच्या प्रकल्प व्यवस्थापक दीप्ती तळपदे यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.