Indigo Airlines : मुंबई- गुवाहाटी इंडिगो विमानाचे ढाका येथे इमर्जन्सी लँडिंग

धुक्यामुळे विमान बांगलादेशात वळवावे लागले.

157
Indigo Airlines : मुंबई- गुवाहाटी इंडिगो विमानाचे ढाका येथे इमर्जन्सी लँडिंग
Indigo Airlines : मुंबई- गुवाहाटी इंडिगो विमानाचे ढाका येथे इमर्जन्सी लँडिंग

मुंबई-गुवाहाटी इंडिगो विमानाचे (Indigo Airlines) शनिवारी (13 जानेवारी) बांगलादेशातील ढाका येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. आसामच्या गुवाहाटी विमानतळावर दाट धुके पसरल्यामुळे हे विमान लँड होऊ शकले नाही. त्यामुळे गुवाहाटीपासून 400 किलोमीटर अंतरावरील ढाका विमानतळावर आपत्कालिन स्थितीत विमान लँड करावे लागले.

(हेही वाचा – Raj Thackeray : अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठापना दिनी राज ठाकरेंनी केले आवाहन, म्हणाले…)

मुंबई ते गुवाहाटी हे विमान दाट धुक्यामुळे वळवण्यात आले आणि ढाका येथे उतरवण्यात आले. इंडिगो फ्लाइट 6-ई 5319 हा या विमानाचा क्रमांक आहे. मुंबईहून गुवाहाटीला जाण्यासाठी निघाले. हे विमान गुवाहाटी येथे आले असता, या ठिकाणी असलेल्या दाट धुक्यामुळे ते गुवाहाटीमध्ये उतरू शकले नाही. यामुळे वैमानिकाने हे विमान ढाका येथे उतरवले. परदेशात झालेल्या लँडिंगमुळे विमानातील सर्व प्रवाशांनी त्यांच्या पासपोर्टशिवाय आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली. दरम्यान इंडिगोकडून प्रवाशांना ढाका येथे लँडिंगची कल्पना देऊन त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या घटनेसंदर्भात इंडिगोच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या इमर्जन्सी लँडिंगमुळे मोठा अपघात टळला आणि सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.