मुंबईतील एल्फिन्स्टन पुला(Elphinstone Bridge)जवळील रहिवाश्यांना घरे खाली करण्याची राज्य शासनाककडून नोटीस देण्यात आली. त्यानंतर आता रहिवाश्यांनी परदेश दौऱ्यावरून परतलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. या भेटीत रहिवाश्यांनी आपल्या मागण्या राज ठाकरेंसमोर मांडल्या आहेत. त्यासंदर्भात मनसेच्या अधिकृत सोशल मीडियावरून “जे तुमची घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या!! अशा आशयाची पोस्ट केली आहे.
Thackeray Vs Shinde : “शिवसेनेचे नवे बॅनर युद्ध!; ‘मैत्री वाघाशी’, शिवसेना उबाठावर थेट हल्ला”
मुंबईतील एल्फिन्स्टन पुला(Elphinstone Bridge)जवळील रहिवाश्यांना घरे खाली करण्याची शासनाकडुन नोटीस देण्यात आली मात्र घरांची पुढील परिक्रमा कशी असेल, स्थलांतरीत घरे देण्याची माहिती न देता नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार सुरु होताच आज स्थानिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटुन व्यथा मांडली. राज ठाकरेंनी या प्रकरणात नागरिकांना धीर देऊन “जो कोणी येईल त्याला सांगा राज ठाकरेंशी बोलणं झालंय. योग्य माहिती मिळाल्याशिवाय घरे खाली होणार नाहीत अशी तंबीही दिली, अशी माहिती मनसेच्या अधिकृत एक्सवरून देण्यात आली आहे.
शिवडी-वरळी उन्नत रस्त्याअंतर्गत नवीन पुलाची बांधणी राज्य सरकारकडून प्रस्तावित आहे. दक्षिण मुंबईतून थेट नवी मुंबईत कमी वेळेत पोहोचता यावे याकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एमएमआरडीए)ने या रस्स्त्याच्या विकासाचे काम घाती घेतले आहे. या विकास प्रकल्पाच्या माध्यमातून प्रभादेवी पूल(Elphinstone Bridge) पाडत त्याजागी डबलडेकर पूल बांधण्याची तयारी दर्शविली आहे. विशेष म्हणजे जुन्या पुलाच्या पाडकामासाठी एमएमआरडीएकडून गेले कित्येक महिने वाहतूक पोलिसांकडून परवानगी मिळत नसल्याने संबंधित पाडकाम रखडलेले आहे.(Elphinstone Bridge)
Join Our WhatsApp Community