Electricity Employees Diwali Bonus : वीज कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार खास; १८,५०० रुपयांचा बोनस जाहीर

175

वीज कर्मचाऱ्यांची (Electricity Employees Diwali Bonus) यंदाची दिवाळी गोड होणार असून दिवाळीनिमित्त त्यांना १८,५०० रूपये बोनस (Diwali Bonus) जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील महानिर्मिती, महापारेषण, महावितरण कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या वीज कर्मचारी, अभियंते व अधिकारी यांना १८,५०० रुपये तर सहायक कामगार यांना १२,५०० बोनस जाहीर झाला आहे. त्यामुळे ७४ हजार ८४४ कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी व ३ हजार ९०९ सहायक कर्मचारी व ट्रेनी अभियंते २३ यांची दिवाळी गोड झाली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी (Electricity Employees Diwali Bonus) वर्कर्स फेडरेशन या संघटनेसह वीज उद्योगातील सर्वच कामगार संघटनांची बोनसबाबत चर्चा सुरू होती. ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला व महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

(हेही वाचा – Mumbai Metro : रात्री उशिरापर्यंत मेट्रोने प्रवास करता येणार, वेळ वाढवण्याबाबत दिल्या सूचना)

बैठकीस महावितरणचे (Electricity Employees Diwali Bonus) अध्यक्ष लोकेश चंद्र, महापारेषणचे अध्यक्ष संजय कुमार, महानिर्मितीच्या अध्यक्ष पी. अनबलगन आणि तिन्ही कंपन्यांचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, कामगार संघटनांचे पदाधिकारी मोहन शर्मा, कृष्णा भोयर, आर. टी. देवकात, सुहास खुमकर, दत्तात्रय गुट्टे असे २७ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रधान ऊर्जा सचिव व तिन्ही कंपन्यांचे व्यवस्थापन यांनी कामगार संघटनांचे (Electricity Employees Diwali Bonus) म्हणणे ऐकून घेतल्यानंतर बोनस जाहीर केला. बोनस दिवाळीपूर्वी बँक खात्यावर जमा करण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी दिली.”

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.