Haryana च्या पाणीपतमध्ये शैक्षणिक जिहाद; संस्कृतच्या शिक्षकाने शाळेत विद्यार्थ्यांना शिकवला कलमा 

60
Haryana : पानिपतमधील सरस्वती विद्या मंदिर शाळेत एका शिक्षकाने आठवीच्या विद्यार्थ्यांना कलमा शिकवल्याची घटना समोर आली आहे. जेव्हा विद्यार्थी घरी गेले आणि शाळेत शिकवले जाणारे कलमा गुणगुणले तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. यानंतर, मुलांच्या पालकांनी शनिवारी शाळेत जाऊन तक्रार केली. यानंतर,  शिक्षकाला ताबडतोब शाळेतून काढून टाकण्यात आले. परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती असल्याने पोलिसही घटनास्थळी पोहोचले. (Haryana)

(हेही वाचा – गोव्याचा समुद्र पहाण्यासाठी येणारे लोक आता Sanatan च्या कार्यामुळे भारतीय संस्कृती पहाण्यासाठी येतात; डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन)

मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी, सरस्वती विद्या मंदिर शाळेत सकाळच्या प्रार्थनेनंतर संस्कृत शिक्षक (Sanskrit teacher) महजीब अन्सारी उर्फ ​​माही यांनी आठवीच्या वर्गात व्याख्यान दिले. या व्याख्यानादरम्यान शिक्षकांनी मुलांना कलमा (Kalma) शिकवला. विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर घरी पोहोचली. घरी पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी कलमा गुणगुणला सुरुवात केली. कुटुंबातील सदस्यांनी हे ऐकले. त्यानंतर पालकांनी आपल्या मुलांना विश्वासात घेत शाळेत दिवसा घडलेल्या घटनेची माहिती मिळवली. मग त्यांना कळले की, शाळेतल्या मुस्लिम शिक्षकाने कलमा शिकवला आहे. यानंतर, सर्व पालकांनी या विषती चर्चा केली आणि शनिवारी एकत्र येऊन शाळेत पोहोचले. पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली. शाळा प्रशासन, पालक आणि शिक्षकांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. पालकांनी शाळेला सांगितले की, अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. तसेच, महिला शिक्षिकेला शाळेतून काढून टाकण्याची मागणी करण्यात आली. पालकांच्या मागणीनुसार, शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षिकेला सेवेतून निलंबित केले.
(हेही वाचा – ‘भारतासाठी बोलणाऱ्यांचा राहुल गांधींना द्वेष का?’; काँग्रेस सरचिटणीसांच्या पोस्टनंतर Shashi Tharoor यांचा उल्लेख करत भाजपचा सवाल)
तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका इंदू यांनी पालकांना सांगितले की, संबंधित शिक्षक मागच्या एका वर्षापासून शाळेत शिकवत आहेत. मी शिक्षकांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितले की, मुलांनी स्वतः त्यांना विचारले होते की ज्याप्रमाणे हिंदू पूजा करतात, त्याचप्रमाणे मुस्लिम काय करतात. मुलांच्या प्रश्नावर, शिक्षकांनी कलमाची ओळ सांगितली. मुख्याध्यापकांनी सांगितले की शिक्षकालाही त्याने कृत्याची लाज वाटली असून, त्या शिक्षेकाला शाळेतून निलंबित करण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.