Jammu and Kashmir : भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू आणि काश्मीरमधील आठ जिल्ह्यांमधील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या. (Jammu and Kashmir )
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू विभागातील पाच जिल्हे – जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पूंछ आणि काश्मीरमधील तीन जिल्हे – बारामुल्ला, कुपवाडा आणि बांदीपोरा येथे सर्व शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या. या संदर्भात, जम्मू आणि काश्मीरच्या विभागीय आयुक्तांनी स्वतंत्र आदेश जारी केले होते.
(हेही वाचा – India Pak War : पाकड्यांचा पुन्हा हल्ला, भारतानेही दिला दणका; आता आणखी एक एफ-16 लढाऊ विमान पाडले)
काश्मीर विद्यापीठ, केंद्रीय विद्यापीठ श्रीनगर आणि जम्मू विद्यापीठाने बुधवारी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या. जम्मू विद्यापीठाचा परिसरही बंद होता. या जिल्ह्यांमध्ये पदवी महाविद्यालये आणि खाजगी संस्था देखील बंद राहिल्या. सध्याची परिस्थिती पाहता, आजही शैक्षणिक संस्था बंद राहतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community