Prakash Raj यांना ईडीचे समन्स

प्रणव ज्वेलर्स घोटाळा प्रकरणी पाठवली नोटीस

76
Prakash Raj यांना ईडीचे समन्स

प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज (Prakash Raj) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. प्रणव ज्वेलर्स मनी लाँड्रिग प्रकरणी ईडीने नोटीस बजावून विचारणा केली आहे.

पोंजी स्कीम घोटाळा प्रकरणात ईडीने तामिळनाडूच्या त्रिची शहरातील प्रसिद्ध प्रणव ज्वेलर्सवर छापा मारला होता. प्रकाश राज (Prakash Raj) प्रणव ज्वेलर्सची जाहिरात करतात. छापेमारीनंतर आता तपास यंत्रणेने प्रकाश राज यांना नोटिस पाठवली आहे.

याबाबत ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील त्रिचीमधील प्रसिद्ध प्रणव ज्वेलर्समध्ये सर्च ऑपरेशन दरम्यान काही अशी कागदपत्रे मिळाली होती. ज्यामध्ये जवळपास 23 लाख 70 हजार रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराची माहिती मिळाली. इतकेच नाही तर, ईडीच्या छाप्यात 11 किलो 60 ग्राम सोन्याचे दागिनेही जप्त केले होते. जनतेकडून गोल्ड स्कीमच्या माध्यमातून जमवलेले 100 कोटी रुपये प्रणव ज्वेलर्सच्या मालकांनी अनेक शेल कंपनीमध्ये गुंतवले होते. तपासात समोर आले की, (Prakash Raj) प्रणव ज्वेलर्स आणि याच्याशी संबंधित लोकांनी फसवणूकीच्या माध्यमातून जमवलेले हे पैसे दुसऱ्या शेल कंपन्यांमध्ये डायवर्ट केले आहेत.

(हेही वाचा – Chhagan Bhujbal : …म्हणून मुंबई सत्र न्यायालयाने मंत्री छगन भुजबळांवर ओढले ताशेरे)

आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) प्रणव ज्वेलर्सचे ब्रांड राजदूत होते. तेच या कंपनीच्या जाहिरातीचा चेहरा आहेत. मात्र प्रणव ज्वेलर्सचा घोटाळा समोर आल्यानंतर त्यांनी या ब्रँडशी संबंध संपवले. आता ते तपास संस्थेच्या रडारवर आले आहेत. त्यांना ईडीने समन्स बजावले असून त्यांना लवकरच चौकशीसाठी बोलावले जाणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.