ED: ईडीची मुंबईत छापेमारी, 200 कोटींचे अमली पदार्थ विकणारा अली अझगर शिराझी पोलिसांच्या जाळ्यात

अली असगर शिराझी दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात मुंबई विमानतळावरून पकडण्यात आलं होतं.

121
ED: ईडीची मुंबईत छापेमारी, 200 कोटींचे अमली पदार्थ विकणारा अली अझगर शिराझी पोलिसांच्या जाळ्यात
ED: ईडीची मुंबईत छापेमारी, 200 कोटींचे अमली पदार्थ विकणारा अली अझगर शिराझी पोलिसांच्या जाळ्यात

अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी ईडीने (ED) मुंबईत छापेमारी (raids in Mumbai) सुरू केली आहे. या छापेमारीत अंमली पदार्थ विकणारा अली असगर शिराझी याच्या विरोधात ईडीकडून छापे टाकण्यात आले आहेत. तो वॉंटेड ड्रग्स लॉर्ड कैलाश राजपूतचा जवळचा सहकारी असल्याची माहिती मिळत आहे तसेच शिराझी याच्यावर २०० कोटी रुपयांच्या ड्रग्जची युरोप आणि ऑस्ट्रेलियात तस्करी केल्याचा आरोप आहे.

ड्रग तस्कर अली असगर शिराझी अंधेरी परिसरात राहतो. त्याचं घर आणि ऑफिसमध्ये ईडीकडून छापेमारी सुरू आहे. मुंबई गुन्हे शाखेने यावर्षी मे महिन्यात शिराझीला अटक केली होती. कुरियर सेवेचा वापर करून ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड किंग्डममध्ये ८ कोटी रुपये किमतीच्या केटामाइन आणि व्हायग्राची तस्करी केल्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. अली असगर शिराझी दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात मुंबई विमानतळावरून पकडण्यात आलं होतं. गुन्हे शाखेनं त्याच्याविरुद्ध जारी केलेला एलओसी आणि त्यानंतर त्याला यावर्षी ताब्यात घेण्यात आलं आहे.

(हेही वाचा – MLA Disqualification Case : … तर आम्हाला यात दखल द्यावी लागेल; सर्वोच्च न्यायालयाची विधानसभा अध्यक्षांना शेवटची संधी )

सूत्रांनी सांगितलं की, अली असगर शिराझीचा संबंध असलेल्या ७ ठिकाणी छापे टाकण्यात आले. इतर ठिकाणीही ईडीची छापेमारी सुरू आहे. यावर्षी मे महिन्यात अली असगरला अटक करण्यापूर्वी अँटी एक्सटॉर्शन सेल (AEC)कडून मार्चमध्ये शिराजीचा शोध सुरू केला. जम्मू आणि काश्मिर, दिल्ली आणि देशातील अनेक ठिकाणी पोलिसांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो त्याचे ठिकाण सतत बदलत होता. अखेर यावेळी ईडीने केलेल्या छापेमारीत त्याला अटक करण्यात आली.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.