अर्जेंटिना आणि चिली या दोन्ही देशांमध्ये ७.४ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचे भूकंप बसले. भूकंपाची (Earthquake) तीव्रता लक्षात घेता त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोक घराच्या बाहेर पडून मोकळ्या जागेत जात आहेत. या संदर्भातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
(हेही वाचा भारताच्या लष्कराला Pakistan घाबरला; नागरिकांना अन्न, औषधे, जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याचे आवाहन)
अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण (USGS) नुसार भूकंपाचे केंद्र अर्जेंटिनाच्या उशुआइया (Ushuaia) या शहरापासून सुमारे २१९ किलोमीटर दक्षिणेस समुद्राखाली होते. त्यामुळे त्सुनामीचा धोका असल्यामुळे चिलीच्या प्रशासनाने देशाच्या दक्षिणेकडच्या संपूर्ण किनारपट्टीच्या भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. तेथील लोकांना तात्पुरता स्थलांतराचा अलर्ट देण्यात आला आहे. भूकंपाच्या (Earthquake) तीव्र धक्क्यांमुळे तेथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, दक्षिण अर्जेंटिनामधील उशुआइयाच्या ड्रेक पॅसेजमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
Join Our WhatsApp Community