जम्मू काश्मीर आणि गुजरातमध्ये भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गुजरातमध्ये शुक्रवारी रात्री 3.4 तीव्रतेचा भूकंप झाला. तर जम्मू काश्मीरमध्ये रात्री झालेल्या भूकंपाची तीव्रता 2.7 इतकी नोंदवली गेली. लेह लडाखमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या ठिकाणच्या भूकंपाची तीव्रता 3.9 इतकी नोंदवली गेली. (Earthquake)
गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (जीएसडीएमए) नुसार, गुजरात भूकंपाच्या बाबतीत उच्च जोखीम असलेले क्षेत्र आहे. गेल्या 200 वर्षांत येथे 9 मोठे भूकंप झाले आहेत. जीएसडीएमएच्या मते, 26 जानेवारी 2001 रोजी कच्छमध्ये झालेला भूकंप गेल्या 2 शतकांमध्ये भारतात आलेला तिसरा सर्वात मोठा भूकंप होता. अंदाजे 13 हजार 800 लोक मृत्युमुखी पडले आणि 1 लाख 67 हजार लोक जखमी झाले. (Earthquake)
अर्जेंटिनामध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप
दक्षिण अमेरिकन देश अर्जेंटिना येथे 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला आहे. त्यामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडे सहा वाजता हा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू अर्जेंटिनामधील दक्षिणेकडील उशुआया राज्यापासून 222 किमी अंतरावर असलेल्या समुद्रातील ड्रेक पॅसेजमध्ये होते, ज्याची खोली 10 किमी होती. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, 15 मिनिटांत त्याच ठिकाणी 5.4, 5.7 आणि 5.6 रिश्टर स्केलचे 3 आफ्टरशॉक देखील आले. ड्रेक पॅसेज हा दक्षिण अमेरिकेतील केप हॉर्न, चिली, अर्जेंटिना आणि अंटार्क्टिकाच्या दक्षिण शेटलँड बेटांदरम्यानचा समुद्री क्षेत्र आहे. (Earthquake)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community