Earthquake : पाकिस्तानमध्ये ४.४ रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप

47
Earthquake : पाकिस्तानमध्ये ४.४ रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप

पाकिस्तानमध्ये रात्रीच्या वेळी भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले आहे. राष्ट्रीय भूकंप केंद्रानुसार,भारतीय वेळेनुसार बुधवारी (दि. ३०) रात्री ९ वाजून ५८ मिनिटांनी हा भूकंप झाला. याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.४ इतकी मोजण्यात आली. या भूकंपामुळे झालेल्या जीवित किंवा मालमत्तेच्या नुकसानाची माहिती अद्याप मिळालेली नाही.

(हेही वाचा – “भारत हा अब्जावधी कथांचा देश” ; Waves 2025 समिटमध्ये पंतप्रधान मोदींचं वक्तव्य)

भूगर्भशास्त्रीय जाणकारांच्या मते, पाकिस्तान तीन प्रमुख टेक्टोनिक प्लेट्सवर येतो. ते म्हणजे अरबी, युरो-एशियन आणि भारतीय. त्यामुळे देशात पाच भूकंपीय झोन तयार होतात. ४.४ तीव्रतेचा भूकंप (Earthquake) मध्यम स्वरूपाचा मानला जातो. त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता कमी असते असे म्हटले जाते. पण तसे असले तरीही त्याचा परिणाम संवेदनशील भागात जाणवू शकतो. यावेळी भूकंपाचे धक्के जाणवू लागताच लोक घाबरून घराबाहेर पडून सुरक्षित ठिकाणी पळताना दिसले. प्राथमिक अहवालानुसार, कोणत्याही भागातून जीवित किंवा वित्तहानीची माहिती नाही.

(हेही वाचा – Yuzvendra Chahal ठरला आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज)

दरम्यान, यापूर्वी मंगळवारी (दि. २९) रात्री उशिरा न्यूझीलंडच्या पश्चिम किनाऱ्यावरही ६.२ तीव्रतेचा भूकंप (Earthquake) जाणवला. तथापि, अधिकाऱ्यांनी कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त दिलेले नाही आणि त्सुनामीचा इशाराही देण्यात आलेला नाही. स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री १ वाजता भूकंप झाल्याचे अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणाने म्हटले आहे. त्याचे केंद्र न्यूझीलंडच्या इन्व्हर कार्गिल शहरापासून ३०० किलोमीटर नैऋत्येस आणि समुद्रात पृष्ठभागापासून १० किलोमीटर खाली होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.