भारतीय रेल्वेचे जाळे संपूर्ण भारतभर पसरलेले आहे. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. अनेक वेळा तिकीट बूक करताना आपण वेगवेगळ्या गाड्यांची नावे वाचतो. दुरंतो, राजधानी या गाड्यांना नावे कशाच्या आधारे दिली जातात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? या गाड्यांना त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार नावे दिली जातात.
( हेही वाचा : ‘बेस्ट’चे स्टेअरिंग महिलांच्या हाती! पहिल्यांदाच महिला बसचालकाची नियुक्ती )
राजधानी ट्रेन
राजधानी या रेल्वेचे नाव राज्यांच्या राजधान्यांना जोडण्यासाठी देण्यात आले आहे. राजधानी दिल्ली पासून इतर राज्यांच्या राजधान्यांना कनेक्ट करणारी गाडी म्हणजेच राजधानी. ही सुपर फास्ट गाडी असून या ट्रेनचा ताशी वेग १४० किमी एवढा आहे. नागरिक दळणवळणाच्या बाबतीत या गाडीलाच प्रथम प्राधान्य देतात.
शताब्दी ट्रेन
शताब्दी ट्रेनने देशात सर्वाधित लोक प्रवास करतात. साधारणपणे ४०० ते ८०० किमीच्या प्रवासासाठी या ट्रेनला सर्वाधिक पसंती दिली जाते. ही ट्रेन देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त १९८९ साली सुरू करण्यात आल्याने या गाडीला शताब्दी ट्रेन असे नाव देण्यात आले. शताब्दी ट्रेन ताशी १६० किमी वेगाने धावते.
दुरंतो ट्रेन
दुरंतो म्हणजेच सर्वात कमी स्टॉप स्थानकांवर थांबणारी ट्रेन. ही ट्रेन लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी वापरली जाते. बंगाली शब्द निर्बाद restless वरून या गाडीला दुरंतो नाव देण्यात आले आहे. दुरंतो गाडीला LHB स्लीपर कोच असतात. जे सामान्य ट्रेनच्या तुलनेत उंच असतात. या कोचमुळे या ट्रेनसा अधिक गती मिळते.