BMC Employees : अनेक कर्मचाऱ्यांचे पगार कापले जाणार?

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची यापूर्वीपासून निवडणूक कामांसाठी मदत घेतली जात असून मतदार यादी सुधारीत करणे तसेच नवीन मतदार शोधणे शिवाय शतायुषी मतदार शोधणे आदीप्रकारची कामे यापूर्वीपासून सुरु आहेत. त्यामुळे या कामांसाठी निवडक कर्मचारी यापूर्वीच गेलेले असले तरी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर अणि उपनगराच्या जिल्हाधिकारींनी महापालिकेच्या सुमारे २५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची निवडणूक कामांसाठी मागणी केली आहे.

17957
BMC Ashray Yojana : देवनार येथील सफाई कामगारांच्या बैठ्या चाळींच्या जागी आता कब्रस्तान

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता निवडणूक कामांसाठी महापालिका कर्मचाऱ्यांच्या (BMC Employees) नेमणुका व्हायला लागल्या आहेत. मात्र, या नेमणुका परस्पर केल्या जात असून कर्मचारीही ऑर्डर स्वीकारत निवडणूक कामासाठी रुजू होत आहे. मात्र, निवडणूक कामांसाठी जात असताना महापालिकेचे कर्मचाऱ्यांच्या हजेरीचा घोळ होत आहे. बहुतांशी कर्मचारी आपण निवडणूक कामासाठी जात असल्याचे आपल्या खात्याला तथा विभागाच्या आस्थापनाला कळवत नाही, तसेच ते सॅप प्रणालीतही नोंदवत नसल्याने पुढील महिन्यात बऱ्याच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराला कात्री लावली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (BMC Employees)

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची (BMC Employees) यापूर्वीपासून निवडणूक कामांसाठी मदत घेतली जात असून मतदार यादी सुधारीत करणे तसेच नवीन मतदार शोधणे शिवाय शतायुषी मतदार शोधणे आदीप्रकारची कामे यापूर्वीपासून सुरु आहेत. त्यामुळे या कामांसाठी निवडक कर्मचारी (BMC Employees) यापूर्वीच गेलेले असले तरी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर अणि उपनगराच्या जिल्हाधिकारींनी महापालिकेच्या सुमारे २५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची निवडणूक कामांसाठी मागणी केली आहे. आजवर महापलिकेच्या सामान्य प्रशासनाला कळवून त्यांच्या माध्यमातून निवडणूक कामांसाठी कर्मचाऱ्यांच्या नेमणुकी केल्या जायच्या, परंतु आता जिल्हाधिकारी कार्यालयांकडून थेट २४ विभाग कार्यालय आणि सर्व विभाग व खाते प्रमुखांना पत्र पाठवून अमुक एक कर्मचाऱ्यांची निवडणूक कामांसाठी नियुक्ती केली गेली आहे असे कळवले जात आहे. (BMC Employees)

(हेही वाचा – Nursing Colleges: राज्यात सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय)

पगार कापला गेल्याने मोठ्याप्रमाणात बोंब बोंब होण्याची शक्यता

परंतु निवडणूक कामासाठी नेमणूक झालेले कर्मचारी (BMC Employees) हाती ऑर्डर पडताच थेट निघून जात आहे. बहुतांशी कर्मचारी हे निवडणूक ड्युटीवर असल्याने हजेरीही नोंदवत नाही तसेच त्यांनी सॅप प्रणालीवर आपण निवडणूक कामासाठी रुजू झाल्याचेही नमुद केले नाही. त्यामुळे निवडणूक कामासाठी रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनी (BMC Employees) आपल्या हजेरीबाबत सॅप प्रणालीवर तसे नमुद न केल्यास जेवढे दिवस हजेरी नसेल तेवढ्या दिवसांचा पगार कापला जाणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात अशाप्रकारे जे जे म्हणून कर्मचारी निवडणूक कामासाठी रुजू होताना त्यांनी सॅप प्रणालीत आपली माहिती नोंदवली नसेल त्यांचे पगार कापले जाणार असल्याने पुढील महिन्यात पगार कापला गेल्याने मोठ्याप्रमाणात बोंब बोंब होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जे जे म्हणून कर्मचारी व अधिकारी निवडणूक सेवेत रुजू झाले आहे त्यांनी आपली माहिती सॅप प्रणालीत नमुद करावी जेणेकरून त्यांची हजेरी ग्राह्य धरली जाऊ शकते आणि त्यांचा पूर्ण पगार निघू शकतो. अनेक कर्मचारी (BMC Employees) हे निवडणुकीचे काम राष्ट्रीय कर्तव्य समजत असून त्यांचे ऑर्डर आल्यानंतर महापालिकेला त्यांची कल्पना न देताच परस्पर निघून जातात. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या आस्थापना विभाग किंवा पालक विभागाला पूर्ण कल्पना देऊनही या कामासाठी गेल्यास अशाप्रकारची समस्या निर्माण होणार नाही असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (BMC Employees)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.