Onion Auction : शेतकऱ्यांच्या अल्प प्रतिसादामुळे बंद पडला कांद्याचा लिलाव

कांद्याला पंचवीसशे रुपये भाव दिल्यानंतर हे भाव कमी झाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लासलगाव येथील लिलावही देखील बंद पाडले.

104
शेतकऱ्यांच्या अल्प प्रतिसादामुळे बंद पडला कांद्याचा लिलाव
शेतकऱ्यांच्या अल्प प्रतिसादामुळे बंद पडला कांद्याचा लिलाव

तीन दिवसांच्या बाजार समिती बंद नंतर गुरुवारी कांद्याचे लिलाव (Onion Auction) सुरू झाले. केवळ लासलगाव मध्ये हे लिलाव सुरु झाले. तर पिंपळगाव आणि येवला येथे योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले. जिल्ह्यातील इतर बाजार समितीमध्ये देखील कांद्याचे लिलाव सुरू झाले आहेत. परंतु शेतकऱ्यांचा प्रतिसाद नसल्याचे सांगण्यात येते आहे. दरम्यान कांद्याला पंचवीसशे रुपये भाव दिल्यानंतर हे भाव कमी झाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लासलगाव येथील लिलावही देखील बंद पाडले.

केंद्र सरकारने निर्यातीवर ४० टक्क्यांनी वाढ केल्यानंतर मागील तीन दिवसापासून जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी व्यवहार न करण्याचा निर्णय घेतला होता. तर जिल्ह्यातील संतप्त झालेल्या शेतकरी वर्गाने स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनामध्ये जास्त संतप्त झाले आहेत.

(हेही वाचा :Chandrayan-3: प्रज्ञान रोव्हरचे चंद्रावर पहिलं पाऊल ,मेड इन इंडिया ,मेड फॉर मून – इस्रो)

सर्व प्रश्नांची चर्चा करण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बुधवारी बैठक बोलावली होती. या बैठकीला व्यापारी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी नाफेडचे अधिकारी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीमध्ये व्यापारी असोसिएशन ने गुरुवारपासून कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे गुरुवारी कांद्याचे लिलाव सुरू झाले होते. बाजारपेठेमध्ये २०० ट्रॅक्टर लिलावासाठी आले होते या ट्रॅक्टरला नाफेड ने दिलेल्या भावापेक्षा ९० रुपये भाव हा सुरुवातीला जास्त मिळाला आहे म्हणजेच लासलगाव येथे पंचवीसशे रुपये क्विंटल ने कांदा खरेदी केला जात आहे.

हेही पहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.