Railway Megablock : मेगाब्लॉक रद्द, दिवाळीची प्रवाशांना रेल्वे कडून भेट

97

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर घेण्यात येणारा ब्लॉक हा रद्द करण्यात आलाय. यामुळे दिवाळीच्या दिवशी देखील प्रवाशांना अगदी निश्चिंत रेल्वेचा प्रवास करता येईल. ऐन दिवाळीच्या दिवशी मुंबईकरांना (Mumbai) प्रवासामध्ये अडचण निर्माण होण्याची शक्यता होती. कारण मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक (Megablock) घेण्यात येणार होता. (Railway Megablock)

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धिम्या मार्गावर तसेच हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाऊन आणि सीएसएमटी ते वाशी, पनवेल, बेलापूर अप आणि डाऊन मार्गावर, सीएसएमटी ते गोरेगाव, वांद्रे मार्गावर , रविवारी नियमित मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मात्र, दिवाळीनिमित्त हा ब्लॉक रद्द केला असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Railway Megablock)

(हेही वाचा : PM Narendra Modi जवानांसोबत साजरी करणर दिवाळी)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.